जल जीवन च्या कामामध्ये अद्याप गिरेवाडी काठवडवाडी व काळेवाडी चा समावेश झालेला नाही प्रस्ताव करून पाठवला असे ठेकेदार व जल जिवन चे अधिकारी सांगतात पर्यंत प्रत्यक्षात वाढीव प्रस्तावास सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेले नाही*

ठेकेदाराने मंत्रालय पातळीवर प्रयत्न करून त्यास मंजुरी मिळवायचे असते ती मंजुरी मिळवण्याकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष झाले आहे त्यामुळे काठवटवाडी गिरेवाडी व काळेवाडी येथील वाडीव प्रस्तावास मंजुरी मिळण्याबाबत शंका निर्माण झाल्या असून असेच दुर्लक्ष झाले तर या भागाच्या लोकांना पिण्याच्या टाक्या व नळ योजना होणार नाहीत ग्रामपंचायतने या कामाकडे लक्ष देणे व कामे सरपंचाने करून घेणे गरजेचे असतात परंतु अधिकारी व ठेकेदार सरपंच यांना फार विश्वासात घेत नाहीत असे दिसून येत आहे या परिसरात राहणारे लोकांनी जागृत होऊन जोपर्यंत वाढीव प्रस्तावांना मंजुरी मिळत नाही तोपर्यंत सर्वच कामे थांबवावे लागणार आहेत त्याशिवाय जल जीवन च्या अधिकारी ठेकेदार हे मंजुरीसाठी धावपळ करणार नाहीत उद्या जानेवारी अखेरला आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे निवडणूक आचारसंहिता लागली तर नवीन कामाला मंजुरी मिळत नसते परिणामी ही कामे असेच अटकून पडतील ठेकेदाराला मात्र झालेले कामाचे पैसे मिळतील भरमसाठ कमई करून ठेकेदार पळून जाईल देवठाण गावचे जे जीवन ची कामे अर्धवट राहतील हे लक्षात घेणे गरजेचे आहे गावातील सर्व जाणकार व सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी त्या कामांकडे लक्ष द्यावे ही कामे थोडी नसून वाढीव प्रस्तावासह तीस कोटीची कामे आहेत याकडे लक्ष देणे गरजेचे आहे

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *