अकोले प्रतिनिधी – विद्याधर सातपुते सर

पुरातन वास्तु व शिल्पांचे जतन करण्याच्या उद्देशाने व मंदिर संवर्धनाचे काम पुरातन खात्याने सुरू केले आहे. टाहाकरी येथील अंबिका मातेच्या मंदिराचे पूर्णपणे स्वच्छ करून त्यावर रासायनिक लेप देण्याचे काम चालू आहे व हे काम लवकरच पुर्ण होणार आहे .
अकोले तालुक्यातील टाहाकारी येथे अंबिका मातेचे हेमाडपंती मंदिर असुन या मंदिराचा ताबा औरंगाबाद पुरातत्व विभागाकडे आहे .
या मंदिराच्या भिंतीवर व गाभा-यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्तींच्या विविध कलाकृती मंदिर उभारणीच्या काळात कोरलेल्या आढळुन येतात . हे मंदिर म्हणजे संरक्षीत स्मारक आहे.
काही वर्षापुर्वी या मंदिराला अकोलेतील राजकिय व्यक्तीकडुन सिमेंट कलर दिल्याचे समजले असुन या सिमेंट कलरमुळे मंदिरातील मुर्ती व कोरीव काम ब-याचशा प्रमाणात अस्पष्ट दिसत होत्या .
या मुर्ती व कोरीव काम जनतेला पुर्ण पहावयास मिळाव्यात व मंदिरांच्या मुर्ती – दगडांवर ऊन , वारा , पाऊस यांचा काहीही परिणाम होऊ नये , तसेच सदर वास्तुचे कायम स्वरुपी जतन व्हावे या उद्देशाने औरंगाबाद येथील पुरातन खात्याकडून टाहाकारी येथील अंबिका मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पुरातन वास्तू सर्वेक्षण भारत सरकारच्या औरंगाबाद विभागाच्या रसायन शाखेच्या श्रीकांत मिश्रा यांच्या व त्यांचे सहाय्यक अनंत गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महिण्यापासुन काम सुरु आहे .त्यांना प्रतिमाकार मनोज सोनवणे हे काम पहात असून त्यांना स्थानिक युवक आदिनाथ एखंडे, मंदीराचे विश्वस्त, पदाधिकारी, सदस्य, ग्रामस्थ हे सहकार्य करीत आहे.
या कामासाठी वीस कुशल कारागिर काम करत असुन क्लिंनीग प्रिझर्व्हेशनचे काम सुरु आहे .
या मंदिराच्या कळसावर ठिकठिकाणी मोठमोठया भेगा पडलेल्या असल्याने मंदिरामध्ये पाणी गळत होते . त्याही भेगा त्याच पद्धतीच्या दगडाची बारीक रेती करुन केमीकलच्या माध्यमातुन पुर्णपणे बुजविण्यात आलेल्या आहेत . मंदिराच्या मुर्तींचे तुटलेले काही पार्ट देखील रसायनांची मदत घेत पुन्हा जसेच्या तसे बसविले आहे .
लवकरच हे मंदिर पुर्वीसारखे स्वच्छ व सुबक दिसणार असुन सर्व भाविकांसाठी खुले होणार आहे . या मंदिराच्या कामासाठी गावातील नागरिकांची चांगल्या प्रकारे मदत होत असल्याचे पुरातत्व विभागाचे दिगम्बर वाघ यांनी सांगितले.

भाविक भक्त व पर्यटक मोठया प्रमाणावर येत असतात.या पुरातत्व मंदिराची दुरावस्था 2018 साली वेरूळ येथे पुरातत्व विभागाचे झालेल्या परिषदेत जेष्ठ पुरातत्व अभ्यासक रमाकांत डेरे यांनी मांडली. या पैकीअमृतेश्वर पाठोपाठ
टाहाकरी येथील अंबिका मातेच्या मंदिराचे काम होत असल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. माजी आमदार वैभवराव पिचड यांनीही टाहाकारी व हरिश्चंद्र गड येथील पुरातत्व मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबत पत्रव्यवहार केलेला आहे.तसेच या कामी नाशिक चे खासदार हेमंत ग़ोडसे, ‌खासदार सदाशिव लोखंडे, माजी मंत्री मधुकरराव पिचड देवस्थानचे अध्यक्ष भाऊसाहेब एखंडे,विश्वस्त सुनिल एखंडे (ठाणे) ग्रामपंचायत व सर्व ग्रामस्थांनी विशेष पाठपुरावा केला.

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *