आरोग्य सेवक जगदीश पाटील यांची ठाणे जिल्ह्यात बदली

देवठाण प्रतिनिधी


अकोले तालुक्यातील देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्रात हिवताप निर्मूलन आरोग्य कर्मचारी जगदीश आनंद पाटील यांची नुकतीच ठाणे जिल्ह्यात बदली झाली आहे

त्यांचं मुळगाव ठाणे जिल्ह्यात जवळच नवी मुंबईत असल्यामुळे त्यांचे दृष्टीने ही सोयीस्कर बदली झाली आहे

जगदीश पाटील यांनी कोरोना काळात अतिशय धाडसी व चांगले काम देवठाण गावी केलेले आहे त्यांचा अतिशय करडा आवाज व बाजारातील भाजीपाल्याचे व्यापारी शेतकरी यांना आवाज दिलाच तर दुकान आवरून घरी पळून जाणारी लोक आपण पाहिलेले आहेत इतका दरारा व चांगलं काम त्यांनी कोरोना काळात आहे त्यामुळे कोरोना योद्धा म्हणून त्यांना जिल्हा परिषदेने ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे शुभहस्ते पुरस्कार देऊन सन्मानित केले होते

दिनांक 15 मार्च 2017 रोजी पहिली ऑर्डर देवठाण येथे मिळाली तिथूनच त्यांच्या नोकरीची सुरुवात झाली

आठ नऊ वर्षाच्या कालावधीनंतर त्यांच्या गावाकडे बदली झाल्यामुळे त्यांना व त्यांच्या परिवाराला व नातेवाईकांना आनंद झाला आहे त्यांच्या आनंदात त्यांचा मित्रपरिवार सहभागी असून देवठाण ग्रामस्थांनीही चांगले काम केल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *