.
देवठाण येथील अंगणवाडी तक कन्या भोजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
देवठाण प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील देवठाण येथील इंदिरानगर अंगणवाडी केंद्रात कन्या पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अंगणवाडीतील चिमुकल्या मुलींचे पूजन करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या
या कार्यक्रमासाठी देवठाण बीट,च्या अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती सोनाली भनगडे यांच्या हस्ते कन्या पूजन करून मुलींचा सन्मान व त्यांच्या प्रति आदरभाव व स्त्री शक्तीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका सौ पद्मा शिवाजी पाटोळे व सौ जयश्री महेश पुरी यांनी विशेष परिश्रम घेतले
अंगणवाडीतील या उपक्रमामुळे चिमुकल्या मुलींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले कन्या पूजनाच्या माध्यमातून मुलींचा सन्मान करण्याचा व समाजात सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला शेवटी मुलींना स्नेहभोजन देण्यात आले
