गायकर गटाचे बहुमत नसताना देवठाण सोसायटीत सुभाष काकड यांचा ठराव संमत
देवठाण प्रतिनिधी
जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदार प्रतिनिधीची निवड करण्यासाठी देवठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीने जिल्हा बँकेचे माजी चेअरमन सिताराम पाटील गायकर यांच्या गटाच्या सौ सविता सुभाष काकड यांची बिनविरोध निवड झाली आहे
सेवा सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती या बैठकीत ठराव मागणीसाठी दोन्ही गटाकडून अनेक जण इच्छुक होते तसे लेखी अर्जही सचिवाकडे ठराव मिळावा म्हणून अनेकांनी केले होते परंतू सोसायटीचे अनेक संचालक गैरहजर राहिल्यामुळे कोरम अभावी सभा रद्द करण्यात आली
त्यानंतर संस्थेचे सचिव यांनी पुन्हा 13 / 0 7 / 2026 रोजी संचालक मंडळाची पुन्हा बैठक बोलावली होती माजी आमदार वैभवराव पिचड गटाचे तेरापैकी सात संचालक व पक्के बहुमत होते परंतु सोसायटीचे विद्यमान संचालक व माजी सरपंच सुभाष काकड यांनी आपलाच ठराव करावा जो पॅनल माझा ठराव करील त्याच्या बाजूने जाईल असे सुचित केले मुळे दोन्हीही पॅनल सुभाष काकड यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून होते
मात्र सोसायटी बहुमत नसलेल्या गायकर गटाने त्याचाच फायदा घेत सुभाष काकड यांच्या पत्नी सौ सविता सुभाष काकड यांचा ठराव करण्याचे निश्चित केले त्यास गायकर गटाच्या सर्व संचालकांनी मान्यता दिली
स्वतः सुभाष काकड यांनी सिताराम पाटील गायकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून मी आपल्या गटात सामील होऊन मी आपल्या गटाचा मतदान प्रतिनिधी म्हणून राहीन माझ्या नावाचा ठराव करावा अशी विनंती केली लागलीच श्री गायकर यांनी देवठाण येथील स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा केली सिताराम पाटील गायकर यांनी सुभाष काकड यांचा ठराव करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा अशा सूचना दिल्या सिताराम पाटील गायकर गटाच्या संचालकांनी सिताराम गायकर यांच्या शब्दाचा मान राखून सुभाष काकड हे गायकर गटात सामील होत असेल तर सौ काकड यांचा ठराव करण्यास संचालकांनी एकत्र बसून सुभाष काकड यांच्या पत्नी सविता सुभाष काकड यांच्या नावावर एकमत केले त्यामुळे त्यांचा ठराव एकमताने संचालकांनी केला
विद्यमान चेअरमन भारत सहाने हे गैरहजर असल्यामुळे उपाध्यक्ष मुरली डोंगरु पथवे यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटी संचालक मंडळाची बैठक पार पार पडली या सभेसाठी अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस पाऊस फाटा घेऊन उपस्थित होते
