राधाकिसन बाबुराव सहाने हे विडी कामगार क्षेत्रातील नामांकित व्यक्ती महत्त्व म्हणून त्यांची ओळख होती त्यांच कुटुंब विडी कामगार व्यवसाय करीत असत
जमीन क्षेत्र कमी असल्यामुळे त्यांचा प्रमुख व्यवसाय विडी कामगार हा होता तसेच शेती हा दुय्यम व्यवसाय होता
त्यांचे मामा अण्णासाहेब श्रीपती बोडके यांची मुलगी पत्नीने अक्खा आयुष्यभर साथ देत होती त्यांचे सख्खे व चुलत मेव्हणे त्यामध्ये दत्तात्रेय अण्णासाहेब बोडके,
रामहरी बाबुराव बोडके व त्यांचे तिन्ही भाऊ लक्ष्मण बाबुराव बोडके स्व. अशोक बाबुराव बोडके व कैलास बाबुराव बोडके
त्याचबरोबर मारुती दामोदर बोडके व त्यांचा भाऊ विष्णुपंत दामोदर बोडके याशिवाय त्यांच्या वाड्यातील सर्व बोडके परिवार राधाकिसन बाबुराव सहाने व त्यांच्या कुटुंबावर अतिशय प्रेम करीत असत त्यामुळे बोडके परिवाराची मोठी साथ शेवटपर्यंत राधाकिसन सुहाने यांना होती
राधाकिसन सहाने यांचे अत्यंत जवळचे मित्र व सहकारी म्हणून मोहन बाबा शेळके हे होते याशिवाय विडी व्यवसाय मध्ये काम करीत असताना निवृत्ती सोनवणे, गोपीनाथ जाधव, गजानन काळे हे त्यांचे जवळचे मित्र होते
त्यापैकी गोपीनाथ जाधव व गजानन काळे हे काही दिवसापूर्वीच वैकुंठवाशी झाल्यामुळे मित्र म्हणून मोहन बाबा शेळके यांचा सहवास आणि आधार त्यांना वाटत असे आणि मोहन बाबा शेळके सातत्याने त्यांच्या सहवासात व संपर्कात असत
राधाकिसन सहाणे यांना ज्ञानेश्वर, संजय व राजेंद्र हे तीन मुलं आहेत मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न असायचा त्यापैकी राजेंद्र व ज्ञानेश्वर यांची पदवीपर्यंत शिक्षण झाले
दरम्यानच्या काळात अगस्ती सहकारी साखर कारखान्यामध्ये नोकर भरती सुरू होती मोहन बाबा शेळके व स्वर्गीय विश्वासराव शेळके यांच्या सहकार्यातून राधाकिसन सहाने यांचा मुलगा ज्ञानेश्वर व बहिणीचा मुलगा अशोक रामभाऊ शिंदे या दोघांना मोहन बाबा शेळके व स्वर्गीय विश्वासराव शेळके यांनी अगस्ती साखर कारखान्यामध्ये नोकरी मिळवून दिली तेव्हापासून सहकारी साखर कारखान्यामध्ये नोकरी करत असत
असा जिवलग परिवार राधाकिसन सहाने यांना मिळाला होता त्यातील काही लोक आज हयात नाहीत पण त्यांनी राधाकिसन सहाणे यांच्यासाठी विशेष प्रयत्न सहकार्य केले होते
मित्र परिवाराला जोडून ठेवण्याची खास शैली राधाकिसन सहाणे यांच्यामध्ये होती अशा मित्रप्रेमी राधाकिसन सहाने यांना वृद्धपकाळाने देवाज्ञा झाली परमेश्वर त्यांना चांगली सद्गगती देवो यांच्या आत्म्यास चिरशांती देवो अशी मी भावपूर्वक आदरांजली अर्पण करीत आहे

आपला
शिवाजी पाटोळे पत्रकार
