देवठाण प्रतिनिधी

राधाकिसन बाबुराव सहाने हे विडी कामगार क्षेत्रातील नामांकित व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती त्यांचे संपूर्ण कुटुंब विडी कामगार व्यवसाय करीत होते

ते शेतकरी कुटुंबातील होते परंतु जमीन क्षेत्र कमी व जिरायत असल्यामुळे त्यांचा प्रमुख व्यवसाय बिडी कामगार हाच होता तसेच शेती हा दुय्यम व्यवसाय करीत होते

त्यांना संपत व अर्जुन असे दोन लहान भाऊ होते दोघांचेही काही दिवसापूर्वी निधन झालेले आहे त्यांचेही कुटुंब बिडी कामगार व्यवसायात कार्यरत होते

त्यांच्या बहिणींपैकी दोन बहिणी श्री शिंदे व श्री रेवगडे कुटुंबात दिलेल्या होत्या त्या आज दोन्हीही हयात नाहीत परंतु त्यांचे मुलं मामांच्या म्हणजे राधाकिसन यांच्या आश्रायाखाली लहान चे मोठे झाले आहेत ते शेवटपर्यंत मामांच्या अज्ञात होते

राधाकिसन सहाने यांची पत्नी सुमन हिचे माहेर गावातीलच श्री बोडके परिवारातील आहे स्वर्गीय अण्णासाहेब श्रीपती बोडके यांचे ते जावई होते श्री बोडके परिवाराची सतत त्यांना साथ व सहकार्य असाय चे

दत्तात्रेय अण्णासाहेब बोडके, रामहरी बाबुराव बोडके, मारुती दामोदर बोडके व नवनाथ मुरलीधर बोडके व संपूर्ण बोडके परिवार राधाकिसन सहाणें यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे असत असं सर्वच नातं परिवार गावातील असल्यामुळे राधाकिसन सहाने हे आपल्या कामकाजात नेहमी बिनधास्त असायचे

राधाकिसन सहाणे यांचे अत्यंत जवळचे मित्र व सहकारी म्हणून मोहनबाबा शेळके हे सातत्याने त्यांच्या संगतीला असायचे मोहनाबाबा शेळके हे अत्यंत जिवलग मित्र होते दिवसातून दोन-तीन वेळा एकमेकांची भेट झाल्याशिवाय त्यांना करमत नसे

याशिवाय विडी व्यवसायामध्ये काम करीत असताना निवृत्ती गोपाळा सोनवणे, गोपीनाथ कारभारी जाधव व गजानन रामचंद्र काळे ही त्यांचे अनेक दिवसापासून चे विडी कामगार क्षेत्रातील मित्र होते त्यापैकी गोपीनाथ जाधव व गजानन काळे काही दिवसापूर्वी वैकुंठवासी झाल्यामुळे मोहन बाबा शेळके हेच त्यांचे शेवटपर्यंत जे खास मित्र होते मोहनबाबा शेळके यांचा दररोज सहवास व संपर्क राधाकिसन सहाणे यांच्याशी असायचा

राधाकिसन सहाने ही राजकारणात अजिबात नव्हते त्यांनी कधी निवडणुका लढवल्या नाहीत अगर सक्रिय सहभाग घेतला नाही बोडकेवाडी परिसरात रेणुका उपसा जलसिंचन शेती पाणी पुरवठा योजना स्थापन करण्यात आली होती त्या पाणी वाटप सहकारी संस्थेचे राधाकिसन सहाने हे संस्थापक, अध्यक्ष होते बोडके परिवाराचा आग्रह असल्यामुळे त्यांनी रेणुका पाणी व संस्थेच्या स्थापनेपासून तर विसर्जनापर्यंत तेच चेअरमन म्हणून काम पाहत होते त्यांचे व्यवहार, विचार अतिशय पारदर्शक प्रामाणिक होते अंतिम काळात वय झाल्यामुळे वृद्धपकाळाने त्यांचे निधन झाले

परमेश्वर त्यांना त्यांच्या मृतात्म्यास चांगली जागा देऊ अशी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो

शब्दांकन
शिवाजी पाटोळे पत्रकार

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *