अकोले तालुक्यातील देवठाण येथील किरण सुगंधराव गायकवाड यांची नुकतीच जाहीर झालेल्या मुंबई पोलीस भरतीत निवड झाल्यामुळे देवठाण परिसरातील जनतेत अतिशय आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

त्याच्या निवडीबद्दल गावातील विविध संस्था संघटनांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह समिती, जनसेवा ग्रामीण विकास मंडळ, व जनजागृती युवक मंडळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आलेला आहे

किरण गायकवाड हा स्वर्गीय लहानु किसन गायकवाड यांचा नातू व सुगंधराव लहानु गायकवाड यांचा चिरंजीव आहे त्यांनी अगदी लहानपणापासून पोलीस होण्याचे स्वप्न मनात धरून ठेवले होते कुठल्या प्रकारचे बडेजाव व जाहिरात बाजी न करता आपला अभ्यास व व्यायाम सातत्याने दोन वर्ष सुरू ठेवला त्यामुळे त्यांना यश सहज प्राप्त झाले

त्यांच्या निवडीबद्दल अगस्ती कारखान्याचे संचालक सुधीर शेळके यांनी त्यांचा सत्कार केला याप्रसंगी शिवाजी पाटोळे अजय शेळके राम सहाणे आधी जण उपस्थित होते

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *