संगमनेर तालुक्यातील चिकणी सह पाचगाव पाणीपुरवठा योजना रखडलेली आहे अकोले तालुक्यातील डोंगरगाव हिवरगाव व देवठाण शिवारात या पाणी योजनेचे काम करण्यास तीन गावच्या ग्रामस्थांचा तीव्र विरोध असताना देवठाण येथील जल जीवन मिशनच्या ठेकेदारास हाताशी धरून छुप्या मार्गाने या पाचगावच्या पाणीपुरवठा योजनेचे काम करण्याचा प्रयत्न होत आहे तो आम्ही आणून पाडणार आहोत अशी माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी दिली
चिकणी सह पाचगावच्या नळ पाणीपुरवठा योजनेचे पाईप लाईन टाकण्यास डोंगरगाव ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे त्यामुळे डोंगरगाव ग्रामस्थांना अकोले तालुक्यातील जनतेचा पाठिंबा असल्याने या नळ पाणीपुरवठा योजनेचे काम रखडून पडले आहे त्याची कोंडी फोडण्यासाठी चिकणी सह पाचगाव पाणीपुरवठा योजनेच्या ठेकेदाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्याच्या संगमनेर येथील कार्यकारी अभियंता यांचे मार्फत छुपा मार्गाने काम सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत
अकोले तालुक्यातील देवठाण दोडकनदी व वरखडवाडी या तीन गावांना पिण्याच्या पाण्यासाठी जल जीवन मिशन योजनेअंतर्गत 30 कोटीची नळ पाणीपुरवठा योजना चालू आहे या नळ पाणी योजनेचे जलशुद्धीकरण केंद्रासाठी पाटबंधारे खात्याच्या मालकीची 22 आर जागा शासनाने दिलेली आहे त्याच शेजारी चिकणी सह पाचगाव नळ पाणी योजने करता देवठाण येथे जलशुद्धीकरण केंद्र होणार आहे त्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी पाटबंधारे खात्याने या सुद्धा नळ योजनेला जागा दिलेली आहे छुप्या मार्गाने काम करण्यासाठी चिकणी च्या जल जीवन च्या ठेकेदाराने देवठाण येथील ठेकेदारास छुप्या मार्गाने काम देऊन गुपचूप पणे देवठाण च्या कामाबरोबर चिकणी चे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे तो देवठाण ग्रामस्थांच्या लक्षात आला आहे त्यामुळे ग्रामस्थांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे उपविभागीय अभियंता श्री अशोक लोहरे यांना भेटून याबाबतची कल्पना दिली आहे कुठल्या प्रकारची छुपे मार्गाने संगमनेरच्या गावांना पाणी जाऊ दिले जाणार नाही अशी भूमिका घेतली आहे छुप्या मार्गाने काम करण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडला जाईल असे देवठाण ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले आहे
: माकपचे नेते कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी सांगितले की आदिवासी ठाकर समाजाची जमीन आढळा धरणासाठी संपादित केली होती परंतु सदर जमिनीची धरणासाठी आवश्यकता भासली नाही म्हणून त्यावेळी संपादित केलेल्या जमिनीची मोबदला रक्कम व पुनर्वसन अथवा धरणग्रस्त म्हणून नोकरी या कुटुंबाला मिळालेली नाही ती जमीन आज आदिवासी ठाकर समाजाच्या ताब्यात असताना पाटबंधारे खात्याने देवठाण व चिकणी ह्या दोन वेगवेगळ्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी लागणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी जमीन देण्यापूर्वी संपूर्ण सर्वे नंबर भूमी अभिलेख कडून मोजून घेऊन हद्द निश्चित करायला पाहिजे होत्या परंतु तसे न करता परस्पर जमिनीचा ताबा ठेकेदाराला दिला हे नियमबाह्य काम जल जीवनाचे अधिकारी करीत आहेत असे असताना चिकणी सह पाचगाव चे काम गुपचूप पणे सुरू करण्याचा प्रयत्न चालू आहे तो कदापि यशस्वी होऊ देणार नाही चिकणी सह पाच गावचे काम बंद करा अन्यथा आंदोलन उभं करू असा इशारा कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी दिला आहे
