केंद्रीय अर्थराज्यमंत्री कराड यांना ग्रामस्थ भेटणार

  1. दिनांक 24 / 12 / 2023

अकोले तालुक्यातील देवठाण येथे राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेची अत्यंत गरज असल्यामुळे लवकरात लवकर बँकेची शाखा सुरू करावी या मागणी साठी ग्रामस्थ केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना भेटणार असल्याची माहिती अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर शेळके यांनी दिली

येत्या 28 डिसेंबर रोजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांना त्यांच्या औरंगाबाद येथील निवासस्थानी देवठाण गावचे शिष्टमंडळ भेटणार असून बँकेच्या शाखेच्या मागणीचा पाठपुरावा करणार आहेत

देवठाण हे गाव मध्यवर्ती ठिकाणी असून गणोरेपासून खिरविरेपर्यंत असलेल्या पंचवीस गावांपैकी सर्वात मोठे गाव आहेत या गावात अजून राष्ट्रीयकृत बँकेची शाखा नसल्यामुळे शेतकरी व्यापारी विद्यार्थी यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असते अनेक वयस्कर ग्रामस्थांना गणोरे अकोले समशेरपुर यासारख्या 12 किमी अंतरावरील गावात जावे लागते त्यामुळे ग्राहकांची फार मोठी अडचण होते

देवठाण गावात दोन माध्यमिक विद्यालय एक कनिष्ठ महाविद्यालय तलाठी कार्यालय प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामपंचायत कार्यालय विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आठ प्राथमिक शाळा तसेच आठ ते दहा दूध संकलन केंद्र आहेत पाटबंधारे वन कृषी सरकारी कार्यालयामार्फत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते त्यामुळे देवठाण गावी बँकेचे नितांत गरज आहे म्हणून शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मध्यस्थीने भेटीसाठी अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची 28 डिसेंबर रोजी भेट मिळावी मागणी केलेली आहे

या राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेच्या मागणीसाठी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशोक बाबा शेळके, माजी सभापती सुहास कर्डीले, बाजार समितीचे माजी चेअरमन चंद्रमोहन निरगुडे, अमृत सागर दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटोळे, बुवासाहेब नवले सहकारी पतसंस्थेचे संचालक एकनाथ सहाने, अकोले तालुका काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष रमेश बोडके, अकोले पंचायत समितीच्या माजी सदस्य सीताबाई पथवे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड तुळशीराम कातोरे, देवठाण विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन जालिंदर बोडके, शिवसेनेचे गट प्रमुख राम सहाने, विभाग प्रमुख शेळके, पांडुरंग मेंगाळ, महेश शेळके हरिदास जोरवर, प्रकाश शेळके महेश सोनवणे ओमप्रकाश काळे आदींनी मागणी केली आहे

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *