आढळा धरणा खालील शेतकऱ्यांना भरमसाठ वाढलेली पानपट्टी कमी करावी
देवठाण. प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील आढळा धरणातील जल उपसा जलसिंचन योजनेच्या शेतकऱ्यांना शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याची पानपट्टी दहा पंधरा पटीने वाढ झाल्याने शेतकऱ्यांवर दुष्काळात तेरावा महिना आला आहे तरी ही वाढलेली पानपट्टी त्वरित रद्द करावी अशी मागणी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचेकडे देवठाण येथील शेतकऱ्यांनी केली आहे
आढाळा धरण परिसरातील शेतकऱ्यांनी आढळा धरणातून रीतसर पाणी परवानगी घेऊन जलसिंचन योजना राबवल्या आहेत पाणी परवानगी घेतलेल्या सर्वच्या सर्व क्षेत्रावर पाणीपट्टी आकारली आहे एकूण जमिनीपैकी किती क्षेत्र धरणाखाली भिजत आहे याची माहिती पाटबंधारे कर्मचाऱ्यांकडे आहे असे असतानाही हे पाटबंधारे कर्मचारी शेतकऱ्यांच्या नावावर असलेल्या सर्वच्या सर्व जमिनीवर पाणीपट्टी आकारणी करतात काहींना तर फक्त एक एकरचा पाणी परवाना दिलेला असताना पाच पाच एकर च्या पाणी पट्ट्या लावण्यात आलेल्या आहेत गणोरे पाटबंधारे विभागाकडे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांवरच या कामाचा भार टाकला जातो त्यातही अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने अत्यंत कमी असल्यामुळे कामाचा ताण त्यांना पडत आहे वसुलीवर परिणाम होत आहे मार्च अखेर आला म्हणून सर्व कर्मचारी वसुलीसाठी घरोघर फिरत आहे वसुलीचे आकडे पाहता शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे त्यामुळे आढळा धरण लाभधारक शेतकऱ्यांनी निवेदन पालकमंत्री विखे पाटील यांच्यासह खासदार सदाशिव लोखंडे व आमदार डॉ किरण लहामटे तसेच जिल्हाधिकारी अहमदनगर यांनाही निवेदनाच्या प्रती पाठवल्या आहेत आमदार किरण लहामटे यांना निवेदन देताना अगस्ती सहकारी कारखान्याचे संचालक सुधीर शेळके देवठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन जालिंदर बोडके खंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी संचालक पांडुरंग मेंगाळ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शेळके इंजिनियर सिद्धार्थ गायकवाड सदाशिव जोरवर आदी ग्रामस्थ उपस्थित होते
