अकोले तालुक्यासाठी सहाशे कोटी रुपये निधी आणणार आमदार डॉक्टर किरण लहामटे यांची ग्वाही

वीरगाव प्रतिनिधी ज्ञानेश्वर खुळे

मी आमदार झाल्यानंतर आतापर्यंत भरपूर निधी आणला आहे आता येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सहाशे कोटी रुपये निधी आणणार आहे तसे प्रस्ताव मी तयार केले आहेत त्यात निश्चितपणे मंजुरी मिळून सहाशे कोटी रुपये अकोले तालुक्या साठी अर्थसंकल्प अधिवेशनात मिळतील अशी काही आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी दिली आहे

विरगाव फाटा ते गणोरे या राज्य मार्गाच्या रस्त्याची रुंदीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे या रस्त्यासाठी पाच किमी करता सहा कोटी रुपये उपलब्ध होणार या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी देवठाण गटाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जालिंदर वाकचौरे हे होते

याप्रसंगी बोलताना आमदार डॉक्टर किरण लहामटे म्हणाले की तालुक्यात विकास कामे करताना अनेकजण विकास कामात खोडा घालण्याचे काही जण काम करीत आहेत विरोधकांनी काही ठेकेदारांना हाताशी धरून ही कामे घ्यायची आणि ती सुरूच करायची नाही किंवा करायचीच नाही अशी भूमिका घेतली आहे आणि व काम बंद पाडण्याचे प्रयत्न सुरू आहे किती अडथळे आणले तरी ही विकास कामांची वेगाने सुरू असलेली गोडधोड थांबणार नसल्याचे सुतोवाच आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी केले आहे

भाजपाचे प्रदेश सदस्य जालिंदर वाकचौरे म्हणाले आमदार लहामटे यांनी चार वर्षात विकास कामांचा डोंगर उभा केला.आमची आढळा नदी बारमाही व्हावी म्हणून आता त्यांनी प्रयत्न करावेत.सह्याद्रीच्या रांगांमधून पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी आढळेत वळविण्यासाठी आता जोरदार प्रयत्न करावेत.केंद्र आणि महायुती मिळून असलेले डबल इंजिनचे सरकारमुळे अकोले तालुक्यात रस्ते झाल्याने दळणवळणाची सुविधा वेगवान झाली.याचे सारे श्रेय भाजप-सेना-राष्ट्रवादी महायुती सरकारचेच आहे.
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शरद चौधरी,अगस्तीचे संचालक रामनाथ वाकचौरे,सुधीर शेळके, दादापाटील वाकचौरे,सुरेश नवले,शिवाजी पाटोळे, अंकुश थोरात, संतोष आंबरे,शुभम आंबरे, सुनिल वाकचौरे, सोमनाथ नेहे यांचेसहित आढळा परिसरातील सर्व गावांचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——————————————–

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *