देवठाण प्रतिनिधी


अकोले तालुक्यातील समशेरपुर येथील दराडे परिवारातील उत्तर नगर जिल्हा शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख व माजी जिल्हा परिषद बाजीराव शंकर दराडे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार सदाशिव लोखंडे यांच्या शिफारशीवरून जिल्हा नियोजन समितीवर नुकतीच निवड झाली आहे

तसेच त्यांच्याच कुटुंबातील दुसरी व्यक्ती अमृतसागर दूध संघाचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते पोपटराव गणोजी दराडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अजित पवार व आमदार डॉक्टर किरण लहामटे व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सिताराम पाटील गायकर यांच्या शिफारशीनुसार नगर जिल्हा नियोजन समितीवर नियुक्ती झाली आहे

त्यामुळे समशेरपुर परिसरात व दराडे परिवारात आनंदाचे वातावरण पसरले असून श्री बाजीराव दराडे शिवसेनेत श्री पोपट दराडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय असून त्यांच्या कार्याची कापावती म्हणून त्यांच्या त्यांच्या पक्षांनी त्यांना नियोजन समितीवर पाठवून कामाबद्दल बक्षीसी बहाल केली आहे

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *