अकोले तालुक्यात सहकार चळवळ मजबूत पणे उभी आहे सिताराम पाटील गायकर
गनोरे :- प्रतिनिधी –
महाराष्ट्रात सहकारात जुणी जाणती फार मोठी माणसे होउन गेली.याच्यामुळे सहकार चळवळ उभी राहिली .सहकारी संस्थाच्या माध्यमातून शेतकऱ्याला वरदान ठरणारी आहे.सावकारा कडुन शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ नये म्हणुन सहकारी सोसायट्यांची निर्मिती झाली असल्याचे मत अगस्ती सहकारी कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा बॅकेंचे संचालक सिताराम पाटील गायकर यांनी व्यक्त केले.
अकोले तालुक्यातील गणोरे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे नविन इमारतीचे उद्घाटन व जिल्हा मध्यवर्ती बॅकेंच्या गणोरे शाखेचे स्थलांतर कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात श्री गायकर बोलत होते. यावेळी जिल्हा बॅकेंचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे,जिल्हा परिषदेचे सदस्य जालिंदर वाकचौरे, अमृतसागर सहकारी दूध संघाची माजी चेअरमन शिवाजीराजे धुमाळ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस .कारभारी उगले,,उपस्थित होते
यावेळी बोलताना श्री गायकर म्हणाले सर्वच सहकारी सोसायट्या चांगल्या चालु आहे.कर्ज वसुली मध्ये अकोले तालुका अग्रभागी आहे.थकबाकी न ठेवता चांगला वसुल देण्याची परंपरा सोसायट्यांनी कायम ठेवली आहे. सहकारी सोसायटीचे सभासद जिल्हा बँक व सहकारी सोसायटी यांचे सर्व सेक्रेटरी कर्मचारी व अधिकारी यांच्या प्रयत्नामुळे व परिश्रमामुळे आजही आपल्या जिल्ह्यात आणि अकोले तालुक्यात सहकार्याचा पाया भक्कमपणे उभा आहे तीच परंपरा आपण सर्वांनी यापुढे चालू ठेवायचे आहे व सहकार चळवळ भक्कमपणे उभे करून समाजाला एक आधार निर्माण करून द्यायचा आहे असेही सिताराम पाटील गायकर यांनी म्हटले आहे
अहमदनगर जिल्हा परिषदेचे गट नेते जालिंदर वाकचौरे म्हणाले मोठ मोठ्या सहकारी संस्था त्यांच्या नियोजणा अभावी मोडकळीस आल्या.ज्या ठिकाणी सहकारी संस्था नाहीत अशा ठिकाणचे शेतकरी सावकारी कर्जामुळे मेटाकुटीस येउन आत्महत्या करत आहे.ज्या ठिकाणी सहकार फोफावल्या तेथे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत नाही.सहकारामुळेच आज शेतकरी टिकला आहे. याप्रसंगी शेतकरी संघटनेचे नेते सुरेश नवले,काॅ.कारभारी उगले,डी.के.गोर्डे आदींनी मनोगतं व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक देखरेख संघाचे माजी व्यवस्थापक अंबादास दातीर यांनी केले तर सुत्रसंचालन हरिष आंबरे सर यांनी केले तर शेवटी आंबरे पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब आंबरे यांनी उपस्थिताचे आभार मानले. जिल्हा बँकेचे गणोरी शाखेचे शाखा व्यवस्थापक तानाजी कोटकर गणोरे गावचे सरपंच संतोष आंब्रे सहकारी सोसायटीचे चेअरमन अशोक आहेर अमृतसागर दूध संघाचे संचालक रामदास आंब्रे अकोले पंचायत समितीचे माजी सदस्य संत नामदेव आंब्रे अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामनाथ बापू वाकचौरे विरगाव विविध कार्य सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुनील वाकचौरे गणोरे सेवा सहकारी सोसायटीचे सचिव विवेक आहेर सुनील दातीर गणेश रेवगडे शुभम आंब्रे सुशांत आरोटे सुनील दातीर बादशाह बोंबले कैलास देशमुख सचिन दातीर सूर्यभान आंब्रे अंकुश थोरात आदी मान्यवर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते
