अकोले तालुक्यातील देवठाण पासून म्हैसवळण पर्यंत रस्ता मंजूर झाला असून या रस्त्याचे भूमिपूजन अकोले चे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते आज संपन्न झाले
शनिवारी सकाळी 11 वाजता सिन्नर अकोले समशेरपुर या रस्त्याच्या त्रिपुलीवर आज भूमिपूजन समारंभ पार पडला या समारंभाचे अध्यक्षस्थानी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशोक बाबा शेळके हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता महेंद्र वाघचौरे व माजी सभापती सुहास कर्डिले हे उपस्थित होते
यावेळी बोलताना आमदार लहामटे म्हणाले की, संगमनेर तालुक्यातील सायखिंडी वेल्हाळे चिकणी, डोंगरगाव, हिवरगाव, देवठाण, सावरगाव, समशेरपुर, टाहाकारी, केळी, सांगवी, मार्गे म्हैसवळण घाट या भागातून रस्त्याचे काम जाणारा असून रस्ता दुपदरी होणार आहे या रस्त्याच्या कामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मोलाचे सहकार्य करून निधी उपलब्ध करून दिला आहे ग्रामस्थांनी आपल्या भागातून जाणारा रस्त्याचे काम चांगले करून घेण्यासाठी जागृत राहावे व काम जर निकृष्ट होत असेल तर सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांशी किंवा माझ्याशी संपर्क करावा शासनाच्या पैशाचा उपयोग या रस्त्यासाठी करून घ्यावा अशी सूचनाही आमदार लहामटे यांनी उपस्थित नागरिकांना दिल्या आहेत
याप्रसंगी अगस्ती सहकारी कारखान्याचे विद्यमान संचालक सुधीर शेळके अमृतसागर दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटोळे देवठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन जालिंदर बोडके देवठाण ग्रामपंचायतचे उपसरपंच माधव कातोरे खंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हरिदास जोरवर, शिवसेना गण प्रमुख राम सहाणे, अनिल सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते महेश सोनवणे सर,रवी गायकवाड,महेश शेळके, नाथू पथवे, खेमा पथवे, गणेश जाधव,प्रकाश शेळके, परशराम शेळके,लक्ष्मण काकड,अंकुश काकड, दगु दराडे,सुभाष दराडे,संजू दराडे, सदा जोरवर, विष्णू शेळके, आनंदा शेळके, तुकाराम पाटोळे आणि अनेक देवठाण ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते…
