देवठाण प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील देवठाण परिसरातील वरखडवाडी येथील ज्योती गोरख बोडके हिची सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक स्थापत्य अभियंता पदावर निवड जाहीर झाली आहे ज्योती बोडके हीचे निवडीबद्दल गावात व तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे देवठाण गावात परिसरात ज्योती बोडके यांच्या निवडीमुळे आनंदाचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांच्या वतीने लवकरच तिचा सत्कार करण्यात येणार आहे भटक्या विमुक्त जमाती ड मधून तिची निवड झाली
