देवठाण प्रतिनिधी
देवठाण येथे पूजा गोरडे हिचा सत्कार

देवठाण येथे पूजा गोरडे हिचा सत्कार
अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील प्राथमिक शिक्षक केशव गोरडे यांची कन्या पूजा गोरडे हिची राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत सर्व राज्यात सर्वसाधारण प्रवर्गातून अकराव्या क्रमांकावर उत्तीर्ण झाल्यावर विक्रीकर निरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल अकोले तालुक्यातील तिचा गौरव सन्मान व सत्कार होत आहे त्याचप्रमाणे आज देवठाण येथे तिचा नागरिक सत्कार करण्यात आला यावेळी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते
अक्षय डिजिटल फ्लेक्स व माळशेज सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पूजा गोरडे हिचा सत्काराचे आयोजन करण्यात आले होते या सत्कार समारंभात बोलताना पूजा गोरडे म्हणाली की माझे वडील व मी देवठाण गावामध्ये वडील नोकरीला असल्याच्या निमित्ताने देवठाण गावात राहत होते त्याच गावात माझा मानसन्मान होतो याचा मला निश्चित आनंद आहे देवठान सारख्या गावाला मी कधी विसरणार नाही असेही कु गोरडे म्हणाली
याप्रसंगी अक्षय फ्लेक्स चे मालक अक्षय नेरकर व माळशेत पतसंस्थेचे संचालक संतोष सहाणे मॅनेजर गोकुळ येलमामे कॅशियर भास्कर पथवे संदीप भोर सचिन वाकचौरे संदीप हासे इकबाल इनामदार चंद्रभान सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होतेल





