शिवसेनेचे शिष्टमंडळ पालक मंत्र्यांना भेटले व खासदार लोखंडे यांच्या उमेदवारीला विरोध न करण्याची केली विनंती

अकोले प्रतिनिधी

अकोले नेवासा श्रीरामपूर कोपरगाव संगमनेर व राहता तालुक्यातील शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून विनंती केली की खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उमेदवारी विरोध करू नये व जागा शिवसेनेच्या शिंदे गटालाच असावी त्यामध्ये हस्तक्षेप करू नये असा आग्रह धरला आहे

शिवसेना शिंदे गटाचे उत्तर नगर जिल्ह्यातील शिवसैनिकांनी लोणी येथील जनसेवा कार्यालयात पालकमंत्री विखे पाटील यांची भेट घेतली या शिष्टमंडळातील काहींशी बोलताना नामदार राधाकृष्ण विखे पाटील खाजगीत म्हणाले की मी कुठेही अगर कोणत्याही बैठकीत खासदार सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी देऊ नका असे म्हटले नाही भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीने व प्रमुख कार्यकर्त्यांनी शिर्डीची लोकसभेची जागा भाजपाकडे द्यावी असे मत काहींचे होते त्यामध्ये माझे कोणतेही मत पक्षाने मागवलेली नाही व मी पक्षाकडे मत प्रदर्शित केलेले नाही उलट मागील निवडणुकीत शिवसेनेचे वतीने शिर्डी लोकसभा मतदारसंघात सदाशिव लोखंडे यांना उमेदवारी मिळवून दिली व त्यांना भाजप शिवसेनेच्या वतीने निवडून आणण्यासाठी त्यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी त्यावेळी निवडणुकीत लक्ष घासण्याचा आदेश व सूचना केल्या होत्या खासदार लोखंडे यांना निवडून आणण्यासाठी सातत्याने माझ्याशी संपर्क ठेवलेला होता खासदार लोखंडे हे त्यावेळी निवडून आल्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तिगत मला फोन करून खासदार लोखंडे निवडून आणल्याबद्दल माझे व्यक्तिगत आभार मानले होते

मी महायुतीने तिकीट खासदार लोखंडे यांना दिल्यावर त्यांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे अग्रक्रमाने मी पुढे राहील त्याची सर्वस्वी जबाबदारी मी घेईल तुम्ही लोकांमध्ये जा वातावरण निर्मिती करा पंतप्रधान मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचाच खासदार निवडून आला पाहिजे असा चंग सर्वांनी बांधू या असे आश्वासन खाजगीत काही निवडक कार्यकर्त्यांशी बोलताना दिले आहे

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *