पुढील पाच वर्षात अकोले तालुक्यातील पर्यटन विकासाला प्राधान्य देणार = खासदार सदाशिव लोखंडे

देवठाण प्रतिनिधी

येत्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर पुढील पाच वर्षात अकोले तालुक्यातील पर्यटन विकासाला प्राधान्य देण्यात येईल असे आश्वासन खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली आहे

खासदार लोखंडे बुधवारी अकोले तालुका दौऱ्यावर आले होते त्यावेळी शिवसेना पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक पार पडली बैठकीत बोलताना खासदार लोखंडे बोलत होते या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बाजीराव दराडे शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय वाघचौरे शिवसेनेचे जिल्हा युवक अध्यक्ष महेश देशमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाप्रमुख दत्ता नवले आधी जण उपस्थित होते

सन 2019 पासून 2024 पर्यंत मी निळवंडे च्या कामाला प्राधान्य दिले होते सातत्याने पाठपुरावा सरकारी दरबारी वेळोवेळी ही मागणी लावून धरली गेली 40-50 वर्ष पासून या निळवंडे धरणाचे काम अतिसंत गतीने चालू होते लोकसभेत प्रश्न उपस्थित करून सर्वच परवानगी मिळवल्या व राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या पाठीमागे लागून निधी मिळवून दिला म्हणूनच निळवंडे चे काम गेल्या पाच वर्षात प्रगतीपथावर होते आणि ते काम मी मार्गी लावू शकलो त्याला याचा मला खूप आनंद आहे जनतेमध्येही त्याच्या प्रतिक्रिया आहेत या पुढील काळामध्ये यापूर्वी 25 वर्ष आमदार आणि खासदार असताना ज्या पद्धतीने साधेपणाने सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून वागणूक दिली सर्वांना बरोबर घेऊन चालण्याची माझी पद्धत आहे ती मी यापुढे चालू ठेवीन असे खासदार लोखंडे यांनी म्हटले आहे


संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *