देवठाण येथील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत
. महत्वाची सूचना
अकोले तालुक्यातील देवठाण गावचे अंतिम विभाजन दोन-तीन दिवसात पूर्ण होणार आहे आपले गावातील प्रत्येक जमिनीचा सर्वे नंबर बदलणार आहे तो बदल राज्य, जिल्हा, आणि तालुका पातळीवर पूर्ण झाला आहे आता आपल्या गावचे पातळीवरील दप्तराचे बदल करण्याचे काम कामगार तलाठी करीत आहे ते सुद्धा दोन-तीन दिवसात पूर्ण होणार आहे
म्हणून देवठाण गावातील नवीन खरेदी विक्री व्यवहार दुय्यम निबंध कार्यालयास पत्र देऊन तहसीलदाराने तूर्त आठ दिवसासाठी बंद केले आहेत सांगण्यात आलेले आहे
तसेच यापूर्वी झालेल्या
जमीन खरेदी विक्री
कर्ज बोजा कमी जास्त
व वारस नोंदी
व खाते वाटप
सुद्धा आठ दिवसासाठी बंद करण्यात आलेले आहे
येत्या दोन-तीन दिवसात गावातील प्रत्येक जमीन सर्वे नंबर बदलणार असून नवीन सर्वे नंबर दिले जाणार आहेत नवीन सर्वे नंबर दिल्यानंतर मगच आपापले नवीन व्यवहार केले तर मनस्ताप होणार नाही याबाबत तलाठ्याची चर्चा करून माहिती मिळवावी अशी माहिती घेऊनच आपल्या जमिनी क्षेत्रातील बदल करावेत
दोडकनदी व वरखडवाडी परिसरात लागणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सूचना आहे की यापुढे सात बाराच्या उताऱ्यावर नवीन गावाचे नाव व नवीन सर्व नंबर येणार आहे हा फार मोठा बदल होणार असल्याने नवीन शेतकरी कार्ड शेतकऱ्यांनी काढलेले नसतील त्यांनी ते दोन-तीन दिवस काढू नयेत सातबारा उतारा नवीन तयार झाल्यावरच काढावेत म्हणजे पुन्हा बदल करावा लागणार नाही नाही तर शेतकऱ्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागेल ही सूचना लक्षात घेणे अत्यंत गरजेचे आहे
माझ्या या लेखा बद्दल किंवा यापेक्षा जास्त काही माहिती ज्यांना हवी असेल त्यांनी कामगार तलाठी देवठाण व सर्कल कार्यालय वीरगाव किंवा तहसील कार्यालय अकोले यांचे कडे खात्री करून घ्यावी म्हणजे मनस्ताप होणार नाही
जन हितार्थ माहिती प्रसिद्ध
आपला ग्रामस्थ
शिवाजी पाटोळे पत्रकार
