आमदारांनी देवठाण ला रस्ता दिला पण पाटबंधारे खात्याने थांबवला मात्र ठेकेदार अडकला

देवठाण प्रतिनिधी

अकोले तालुक्याचे आमदार किरण लहामटे यांनी निवडणुकीपूर्वी देवठाण येथील गणेशखिंड परिसरात डाव्या कालव्याच्या कडेने जाणाऱ्या रस्त्यासाठी अंदाजे 50 लाख रुपये निधी मिळवून दिला रस्ता मंजूर झाला रस्त्याचे टेंडर झाले ठेकेदार फायनल झाला रस्त्याची वर्क ऑर्डर झाली व रस्त्याचे भूमिपूजनही झाले रस्त्याचे काम ठेकेदाराने सुरू केले

परंतु पाटबंधारे खात्याची परवानगी घेतली नसल्यामुळे रस्त्याचे काम बंद पाडले व लवकरात लवकर पाटबंधारे खात्याची परवानगी घ्यावी अशी विनंती पाटबंधारे खात्याने सार्वजनिक बांधकाम विभागाला केली आणि रस्ता बंद झाला

आता याची परवानगी कोण घेणार त्यासाठी पाठपुरावा कोण करणार जोपर्यंत पाठपुरावा होत नाही तोपर्यंत परवानगी मिळत नाही म्हणजे आमदारांनी पैसे देऊन सुद्धा स्थानिक कार्यकर्त्यांना रस्ता करून घेतला पाहिजे

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकोले कार्यालयाकडून प्रस्ताव तयार करून घेऊन तो संगमनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्यामार्फत अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांचेकडे तो प्रस्ताव सादर करावा लागेल

पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता तो प्रस्ताव पाटबंधारे खात्याचे शाखा अभियंता चिकणी यांना चौकशी करून व प्रस्तावाची पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल मागवतील अहवाल अहमदनगर पाटबंधारे खात्याला सादर झाल्यावर परवानगी मिळेल मग रस्ता सुरू होईल

इतका मोठा परवानगीचा तो प्रवास आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक कार्यालयात जाऊन पाठपुरावा करावा लागेल आपोआप परवानगी मिळणार नाही मिळाले तर त्याला सहा महिने लागतील

आमदारांनी कामे देऊनही काम करून घ्यायला कार्यकर्ते कमी पडतात की काय असे जनतेला वाटत आहे

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *