देवठाण येथे अंगणवाडी केंद्रात महिला बालक मेळावा संपन्न
देवठाण प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील देवठाण येथील इंदिरानगर आणि गिर्हेवाडी येथील अंगणवाडी केंद्रामध्ये महिला बालक व किशोरवयीन मुली यांचा संयुक्त पालक मेळावा संपन्न झाला
एकात्मिक महिला बालविकास प्रकल्प कार्यालय अकोले अंतर्गत शंभर दिवसाचा कृती कार्यक्रम नुसार हा मेळावा संपन्न झाला
या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून देवठाण गटाच्या अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती सोनाली भनगडे उगले ह्या होत्या तर याप्रसंगी देवठाण प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर आदिती देशमुख याही उपस्थित होत्या
आढळा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील किशोरवयीन मुली मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या मुलींना आरोग्य विषयक मार्गदर्शन डॉक्टर आदिती देशमुख यांनी केले किशोरवयीन मुलींच्या समस्या व त्यावर उपाय यावर विषयावर अतिशय चांगले मार्गदर्शन करण्यात आले
याप्रसंगी शाळेच्या शिक्षिका जया कोळपे श्रीमती कोटकर श्रीमती शेंडगे आरोग्य सेविका शेख सिस्टर व अनेक महिला पालक उपस्थित होत्या
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती पद्मा पाटोळे यांनी तर आभार श्रीमती प्रतीक्षा बोडके यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी जया उगले व राजश्री शेळके यांनी परिश्रम घेतले
