देवठाण येथे एकाच आठवड्यात वेगवेगळ्या विषयावर दोन वेगळे आंदोलने
देवठाण = प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील देवठाण येथे पुढील आठवड्यात मी दोन वेगवेगळ्या विषयावर दोन वेगवेगळे आंदोलन होणार असल्याने अधिकाऱ्यांची मात्र तारांबळ उडण्याची शक्यता आहे दोन वेगवेगळ्या आंदोलन असली तरी विषय मात्र वेगवेगळे आहेत
देवठाण गावाचे विभाजन होऊन चार वर्षे उलटून गेली आहेत मात्र अजूनही स्वतंत्र सातबारा उतारे व स्वतंत्र महसुली दप्तर तयार झाले नाही अनेक वेळा पाठपुरावा करून सुद्धा महसूल खाते याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही त्यामुळे ग्रामपंचायत विभाजनाला विलंब होत असून सातबारा व महसूल विभागाचे स्वतंत्र दप्तर तयार झाल्याशिवाय दोडकनदी व वरखडवाडी हे दोन नवीन महसुली गावे पेसा क्षेत्रात टाकता येत नाही
तसेच देवठाण पासून तर सावरगाव सरहद्दी पर्यंत रस्ता अत्यंत खराब झाला आहे तेथे वाहने काय पण माणसाला सुद्धा चालता येत नाही इतकी दुरावस्था झालेली आहे तेव्हा या रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे व वीटभट्टी जवळ असलेला चढउतार कमी करावा
तसेच वरखडवाडी फाटा पासून गिरेवाडी फाट्यापर्यंत खडीक्रेशर जवळून जाणार रस्ता अत्यंत खराब झाला असून तेथे चालता सुद्धा येत नाही हा एक किलोमीटरचा रस्ता कॉंक्रिटीकरण करण्यात यावा अनेक वेळा डांबरीकरण करून सुद्धा हा रस्ता टिकत नाही त्यामुळे करण्यात यावे
देवठाण वरखडवाडी दोडकनदी या तिन्ही गावातील आदिवासी लोकांच्या मयतांच्या वारस नोंदी व खातेवाटप दोन वर्षां प्रलंबित आहे त्यामुळे पंतप्रधान मोदी किसान योजना मार्फत मिळणारे अनुदान शेतकऱ्यांना मिळत नाही अनेक योजना पासून वंचित राहतात त्यांना योजना मिळाव्या म्हणून महसूल सप्ताह कॅम्पमध्ये अनेक लोकांनी प्रस्ताव तहसील कार्यालयात दाखल केले आहे परंतु त्या अंतिम मंजुरी मिळत नाही मिळाली तर तलाठी नोंदी टाकीत नाहीत तलाठ्याने नोंद टाकला तर सर्कल त्याला मंजुरी देत नाही अशा अनेक अडचणींना सामना करावा लागतो तर प्रलंबित प्रकरण त्वरित निकाली काढण्यात यावीत या मागणीसाठी हे आंदोलन होणार आहे तसे निवेदने आठवड्यात संबंधित महसूल खात्याच्या वरिष्ठांना शिवाजी पाटोळे यांनी इतरांनी यापूर्वीच दिलेले आहेत
———–
दुसऱ्या गटाच्या वतीने देवठाण गावात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून गावातील जलजीवन योजना,चा यापूर्वी अधिकाऱ्यांनी जॅकवेल रद्द केला आहे चिकणी व देवठाण या दोन्ही योजनांचा एकत्र जॅकवेल केला आहे तो अत्यंत चुकीचा असून दोन स्वतंत्र मंजूर होते स्वतंत्र मंजुरीप्रमाणे देवठाण साठी स्वतंत्र व चिकणी साठी स्वतंत्र मंजुरीप्रमाणे जॅकवेल व्हावेत अशी मागणी केलेली आहे
गावातील प्रत्येक वाडीवस्तीत पाणी मिळावे म्हणून नवीन प्रस्ताव मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत मंत्रालयात प्रस्ताव पडून आहे त्यास मंजुरी मिळावी व वाढीव पाच कोटीची कामे पाच कोटीची कामे करता यावी म्हणून त्वरित सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात यावी ही सुप्रमा मिळाल्याशिवाय पुढील काम होणार नाहीत तेव्हा लवकरात लवकर मंजुरी मिळावी
तसेच तयार करण्यात आलेला जॅकवेल च्या कामाची चौकशी व्हावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडे केली आहे त्यात आंदोलन करणार असल्याचा इशाराही देण्यात आलेला आहे
दोन वेगवेगळे गट दोन वेगवेगळ्या विषयावर दोन वेगवेगळे आंदोलन करणार असल्याने अधिकाऱ्यांची गडबड उडणार आहे प्रलंबित कामे त्वरित मार्गे लावावी लागणार आहे राजकारणाचा काही भाग काहीही असला तरी आंदोलन मुळे कामांना गती मिळेल ही सकारात्मक भूमिका निश्चित पणे जाणवेल असे ग्रामस्थांना वाटते
