देवठाण प्रतिनिधी

देवठाण गावचे प्रसिद्ध सरपनाचे व्यापारी अनिल रामनाथ सोनवणे यांचा वाढदिवसाच्या निमित्त त्यांच्या त्यांनी देवठाण गावच्या विकासासाठी जे दोन वर्ष काम केले ते प्रचंड उल्लेखनीय काम होते तसेच कमालीचे धाडसाने केलेले कार्य हे देवठाण गावात दिसून आलेले आहे
त्यांची पत्नी सौ रोहिणी सोनवणे ह्या देवठाण गावच्या सरपंच असताना त्यांनी त्यांच्या पत्नीच्या माध्यमातून तिच्या सरपंच पदाच्या कालावधीत दशक्रिया विधीच्या ठिकाणी बांधलेला सभा मंडप हा भूतो ना भविष्याचा कालावधीत होणारा सभा मंडप आहे
अनेक जण जिल्हा परिषद सदस्य झाले तर अनेकजण पंचायत समितीचे सदस्य झाले अनेकांनी आश्वासाने देऊन सुद्धा भैरवनाथ मंदिराकडे पथदिवे स्ट्रीट लाईट देऊ शकले नाही त्या परिसरातील रहिवासी जनता आणि तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य संजय पांडुरंग बोडके यांनी आग्रह धरला की भैरवनाथ मंदिराकडे जाणारी स्ट्रीट लाईट ग्रामपंचायत निधीतून करण्यात यावी त्यावेळी ग्रामपंचायतचे स्ट्रीट लाईट व पिण्याच्या पाण्याची वीज मंडळाची थकबाकी होती त्यामुळे वीज मंडळ करण्यास परवानगी देत नव्हते परंतु वीज मंडळावर प्रचंड दबाव आणून राजकीय शक्तीचा वापर करून दोन महिन्याच्या आत ग्रामपंचायतच्या वित्त आयोगातून स्ट्रीट लाईट पूर्ण करून घेतली
उदाहरण म्हणून हे दोनच कार्य आपल्यासमोर ठेवत आहे त्यावरून त्यांच्या कामाची पद्धत व धाडस लक्षात येते
त्यांची पत्नी सरपंच असताना सरपंच पदावर अनेक लोक सरपंच झालेत आणि होऊन गेलेत कै अमृत मेहता यांचे नंतर स्वतःच्या अधिकारात स्वतःचा निर्णय घेऊन कुणालाही ना जुमानता कुणाचा दडपण न घेता कोणी काहीही म्हणू देतं घेतलेला निर्णय व घेतलेलं काम पूर्ण करणे त्यात किती ही कोणी अडथळे आणले तरी ते अडथळे मोडून काढून आपलं कार्य पूर्णत्वास नेले राजकारणात त्या व्यक्तीला अगर पदावर बसलेल्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी अनेक आरोप प्रत्यारोप होत असतात ते देवठाण मध्येच नाही तर आपले देशात या आरोप होत असतात परंतु त्या आरोपांकडे दुर्लक्ष करून मिळालेल्या दोन अडीच वर्षाच्या कालावधीत संधीचं सोनं केलं आपलं कार्य रेटून नेलं त्यांच्या कार्यास व वाढदिवस हार्दिक शुभेच्छा व हार्दिक अभिष्टचिंतन
आपला नम्र
शिवाजी पाटोळे पत्रकार
