oplus_2048

देवठाण येथील सरपंच सौ सहाने यांचा सोसायटी कडून सत्कार

देवठाण प्रतिनिधी

oplus_2048

देवठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी, च्या वतीने संचालक मंडळाच्या उपस्थितीत देवठाण,च्या नवनिर्वाचित सरपंच सौ विजया अनिल सहाने यांचा सन्मान करण्यात आला शाल श्रीफळ व गुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला याप्रसंगी सोसायटीच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या

सोसायटीचे चेअरमन सुभाष दराडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या सत्कार सोहळ्याला
अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशोक बाबा शेळके, विद्यमान साखर कारखाना संचालक सुधीर शेळके, मावळते सरपंच निवृत्ती जोरवर,बुवासाहेब पतसंस्थेचे संचालक एकनाथ सहाने, सोसायटीचे व्हाईस चेअरमन मुरलीधर पथवे, बाजार समितीचे माजी चेअरमन चंद्रमोहन निरगुडे, पंचायत समिती माजी सभापती सुहास शेठ कर्डिले, माजी चेअरमन जालिंदर बोडके, आर आर सहाणे ,शिवाजी पाटोळे, महेश मोहन शेळके, पंढरी आप्पा शेळके, राम सहाणे, भरत सहाने, श्रीकांत सहाने, शांताराम काकड, सोसायटीचे सचिव शांताराम जोरवेकर, संतोष कराड, किरण सोनवणे, अजय शेळके, आदी मान्यवर उपस्थित होते
यावेळी सत्काराला उत्तर देताना सरपंच सौ विजया सहाने म्हणाल्या की देवठाण गावाने व गावातील सर्व ग्रामस्थांनी व सर्वच राजकीय पक्षाच्या मंडळींनी जो मला आशीर्वाद दिला पाठिंबा दिला व माझ्यावर विश्वास दाखवला त्या विश्वासास पात्र राहून मी माझ्या कालावधीमध्ये ग्रामपंचायत ची सरपंच म्हणून विविध विकासकामे मार्गी लावणार आहे त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे व ते मला मिळेल याची खात्री आहे असे सौ सहाने म्हणाल्या

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *