अकोले तालुक्यातील देवठाण गावाचे विभाजन करून वरखडवाडी आणि दोडकनदी या दोन आदिवासी वाड्यांना दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देऊन दोन महसूल गावे निर्माण केली आहेत परंतु या दोन गावांना स्वतंत्र ग्रामपंचायती व्हाव्यात म्हणून दोन वर्षापासून ग्रामस्थ पाठपुरावा करीत असून महसूल, भूमी अभिलेख, व जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडून सातत्याने टाळाटाळ होत असल्याने आदिवासी समाज तीव्र आंदोलन करणार असल्याची माहिती पांडुरंग मेंगाळ यांनी दिली

देवठाण गावात दहा हजाराहून जास्त लोकसंख्या आहे त्यापैकी साठ टक्के लोकसंख्या आदिवासी ठाकर समाजाचे आहे आदिवासी ठाकर समाज हा दोडकनदी वरखडवाडी या परिसरात राहत आहे या वाड्यांची आदिवासी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे मात्र हा परिसर आणि गाव आदिवासी उपयोजन क्षेत्रात अर्थात पैसा क्षेत्रात समाविष्ट नाही त्यामुळे या गावाला व आदिवासी समाजाला आदिवासी विभागाच्या विविध प्रकारच्या योजना लागू होत नाही परिणामी आदिवासी वस्तीचा व आदिवासी समाजाचा वैयक्तिक विकास मोठ्या प्रमाणात खुंटला आहे आणि तो विकास व्हावा म्हणून देवठाणच्या ग्रामसभेने तीन वर्षापूर्वी स्वतंत्र महसुली गावे निर्माण व्हावीत म्हणून एकमुखाने ठराव केला होता त्यानुसार सरकारने 22 डिसेंबर 2021 रोजी अधिसूचना काढून दोडक नदी व वरखडवाडी या आदिवासी वाड्यांना स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देण्यात आला आहे

या दोन वाड्यांना स्वतंत्र गावाचा दर्जा मिळाल्यानंतर 10 फेब्रुवारी 2023 रोजी झालेल्या ग्रामसभेत देवठाण ग्रामपंचायत विभाजन करून वरखडवाडी आणि दोडकनदी या महसुली गावांना स्वतंत्र ग्रामपंचायती करण्यात याव्यात असा ठराव संमत झाला होता त्या ठरावाच्या प्रती महसूल भूमिअभिलेख व जिल्हा परिषद यांना पाठवण्यात आल्या होत्या त्यानंतर महसूल खात्याने देवठाण येथील कामगार तलाठी व ग्रामविकास अधिकारी यांना स्थानिक पातळीरील दप्तर स्वतंत्र तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु कामगार तलाठी व ग्रामसेवक यांच्याकडून अद्याप पर्यंत एक वर्षात त्यांचे कामकाज त्यांच्याकडून पूर्ण झालेले नाही त्यामुळे प्रस्ताव अपूर्ण अवस्थेत पडून आहे मध्यंतरी ग्रामस्थांनी अमरण उपोषण व रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यानंतर तलाठी देवठाण यांनी कामकाला थोडीशी गती दिलेली आहे परंतु अद्याप कामकाज पूर्ण झालेले नाही त्यामुळे स्वतंत्र ग्रामपंचायतचा व स्वतंत्र महसुली गावाचा प्रस्तावाचा दप्तरी ताळमेळ अद्याप बसवलेला नाही हे काम लवकरात लवकर ग्रामसेवक व तलाठी यांनी पूर्ण करावे अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे

लवकरात लवकर स्वतंत्र ग्रामपंचायत निर्माण व्हाव्यात अशी मागणी कॉम्रेड तुळशीराम कातोरे मदन पथवे आनंदा गिरे अहिलाजी गांगड राजेंद्र उघडे एकनाथ पथवे खेमा पथवे हौशीराम कातोरे नारायण पथवे कोंडाजी गांगड मुरलीधर पथवे पोपट गांगड रामभाऊ पथवे आदींनी मागणी केली आहे

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *