देवठाण ते कासारवाडी रस्ता करण्याची ग्रामस्थांची मागणी

देवठाण प्रतिनिधी

अकोले व सिन्नर सरहद्दीवर असलेला देवठाण ते कासारवाडी हा रस्ता अत्यंत खराब झाला असून दळणवळणाच्या लायक राहिला नाही त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी परिसरातील ग्रामस्थांनी आमदार डॉ किरण लहामटे यांचे कडे केली आहे

देवठाण ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की देवठाण गणेशखिंड मार्गे कासारवाडी हा रस्ता झाला तर सिन्नर तालुक्याशी दळणवळणाने जोडण्यात येईल दोन्ही तालुक्यातील गावांना जोडणारा हा रस्ता आहे नाशिक जिल्हा सरहद्द पर्यंत या रस्त्याचे काम सिन्नर तालुक्यातील कासारवाडी गावात पूर्ण झाले आहे मात्र देवठाण शिवारात या रस्त्याचे काम झालेले नाही ते लवकरात लवकर करण्यात यावे असा आग्रह देवठाण गावचा शिष्टमंडळाने आमदार लहामटे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन मागणी केली आहे आमदार किरण लहामटे यांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरात लवकर या रस्त्याचे काम करू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *