- देवठाण प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील आढळा मध्यम प्रकल्पातून रब्बी पिका साठी पहिले आवर्तन सुटले असून शेतकरी म्हणून शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत असले तरी शेतकरी पाटबंधारे अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक रद्द केल्याने जनतेत नाराजी पसरली आहे
देवठाण येथील 1060 द.ल.घ.फु क्षमतेचे हे धरण यावर्षी पूर्ण भरले होते पावसाची परिस्थिती चांगली असल्यामुळे पहिले आवर्तन उशिरा सुटले आहे धरणाच्या उजव्या कालव्यातून तीस क्युसेस तर डाव्या कालव्यातून वीस क्युसेसने पाणी सोडण्यात आले आहे
संगमनेर,चे आमदार बाळासाहेब थोरात व अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्याकडे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागणी केल्यामुळे या दोन्ही आमदार महोदयांनी पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता यांना पत्र लिहून रब्बीसाठी पाणी सोडावे कसे आदेश दिले होते त्यांच्या या तातडीच्या आदेशामुळे चालू वर्षी प्रतिवर्षाप्रमाणे शेतकऱ्यांची व अधिकाऱ्यांची प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्याचे टाळले आहे याबाबत शेतकऱ्यांमध्ये अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहेत अंतर्गत लावण्यात येत आहे दोन्हीही कालव्याची दुरुस्ती करणे फॉल बांधणे, आउटलेट बांधणे, चाऱ्या दुरुस्त करणे यासारखे अनेक vकाम केलेले आहे जवळपास या bकामासाठी चार कोटी 90 लाख रुपये महाराष्ट्र सरकारने पाटबंधारे खात्याच्या अहमदनगर विभागाकडे पाठवलेले आहेत शेतकऱ्यांमध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले आहे की नेमके किती पैसे आले व कोठे कोठे खर्च केले हे विचारण्याची लोकप्रतिनिधी समोर शेतकऱ्यांना संधी आली होती परंतु आमदार थोरात व आमदार डॉक्टर लहामटे आणि पाणी लाभधारक शेतकऱ्यांची बैठकच टाळली आहे त्यामुळे अधिकाऱ्यांना मात्र शेतकऱ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागणार नाही ही बाब पाटबंधारे खात्याच्या दृष्टीने फायद्याची झाली आहे
अकोले संगमनेर व सिन्नर या तीन तालुक्यातील सोळा गावांना या धरणातून शेतीसाठी पाणी दिले जाते त्यामध्ये अकोले तालुक्यातील देवठाण विरगाव हिवरगाव डोंगरगाव पिंपळगावनिपाणी व गणोरे तसेच संगमनेर तालुक्यातील पिंपळगावकोंझिरा वडगावलांडगा, जवळेकडलग, धांदरफळ राजापूर चिकणी निमगाव व चिखली या गावांचा समावेश आहे तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील व नळवाडी या दोन गावांनाही या धरणाच्या पाण्याचा लाभ होतो तीन तालुक्यातील सोळा गावांच्या शेतकऱ्यांना या धरणावर अवलंबून राहावे लागते
