देवठाण येथील विद्यार्थ्यांनी आमदार लहामटे यांची भेट भेट घेऊन तात्काळ रस्ता देण्याची केली मागणी

देवठाण प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील देवठाण येथील बस स्थानकापासून आढळा विद्यालयापर्यंत रस्त्यामध्ये मोठ मोठे खड्डे झाल्यामुळे रस्ता अत्यंत खराब झाला आहे शिवाय या रस्त्यात दरवर्षी पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत जाणे-येणे कठीण झाले आहे त्यामुळे देवठाण बसस्थानकापासून आढळा विद्यालयापर्यंत रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करून मिळावे या मागणीसाठी आढळा कनिष्ठ महाविद्यालयाचे दहा-बारा विद्यार्थी आज गुरुवारी आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या जनता दरबारात पोहोचले व त्यांनी एक निवेदन तयार केले सदरचे निवेदन विद्यार्थ्यांनी स्वतः आमदार लहामटे यांना दिले आमदारांनी सविस्तर निवेदन वाचून याबाबत तात्काळ कारवाई करू व रस्ता मंजूर करून देतो विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊ असे आश्वासन दिले

शिवाय आढळा धरण भरल्यानंतर जलपूजनासाठी येताना मी अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन येऊन या रस्त्याची पाहणी करतो व तात्काळ अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी पाठवून त्याला मंजुरी मिळवून आणतो असे आश्वासन दिले सर्व विद्यार्थ्यांची आपुलकीने विचारपूस करून कोण कितवीला आहे शैक्षणिक प्रगत अभ्यास कसा आहे असे कौतुकास्पद चर्चाही करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली शेवटी विद्यार्थी निरोप घेताना पुन्हा एकदा रस्त्याची मागणी करू लागले तेव्हा आमदार साहेब म्हणाले कुठल्याही परिस्थितीत तुमचा रस्ता होईल असे ठोस आश्वासन दिले त्यामुळे विद्यार्थी खुश होऊन आपल्या गावी परतले

गावातील गाव पुढाऱ्यांना टाळून विद्यार्थी थेट आमदार साहेबांच्या जनता दरबारात जाऊन जेव्हा मागणी करतात व मंजूर करून घेतात तेव्हा निश्चितपणे आमदारांचे दातृत्व लक्षात येते अनेक कामे मंजूर केले आहेत त्याप्रमाणे हे काम लवकरात लवकर मार्गी लागावे अशी ग्रामस्थांची मागणी विद्यार्थ्यांनी आज लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात मांडली त्या सर्व विद्यार्थ्यांचे आमदार महोदयांनी आभार मानले व कौतुक केले

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *