आढळा धरण ओव्हरफ्लो आमदार लहामटे करणार जलपूजन

देवठाण प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील देवठाण येथील आढळा धरण शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागले आहे हे धरण कधी भरेल याकडे 16 गावच्या शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते अखेर आढला धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले धरणाचा विसर्ग चाळीस क्युसेस ने पाणी चालू आहे पाटबंधारे खात्याच्या वतीने शासकीय जलपूजन आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे हस्ते होणार असल्याची माहिती अकोले पाटबंधारे उपविभागीय अधिकारी योगेश जोरवेकर यांनी दिली

आढळा धरण 1060 द,ल. घ. फू क्षमतेचे आहे सन 1975 मध्ये या धरणाचे काम पूर्ण झाले होते या धरणाच्या लाभक्षेत्रात अकोले तालुक्यातील देवठाण विरगाव हिवरगाव डोंगरगाव गणोरे व पिंपळगाव ही सहा गावे तसेच संगमनेर तालुक्यातील धांदरफळ वडगावलांडगा, जवळेकडलग, पिंपळगाव कोंझिरा, निमगावभोजापूर, चिकणी चिखली राजापूर या आठ गावांचा समावेश आहे याशिवाय सिन्नर तालुक्यातील नळवाडी व कासारवाडी ही दोन गावे असे एकंदर सोळा गावांचा शेतीच्या पाण्याचा एक वर्षासाठी प्रश्न मिटला आहे
याशिवाय गणोरे पाचगाव परिसर आणि चिकणी चार गाव परिसर व समशेरपुर चारगाव परिसर आणि देवठाण सह तीन गावे या गावांना पिण्यासाठी नळ पाणीपुरवठा योजना याच धरणातून जलजीवन मिशन अंतर्गत राबवले आहेत त्यामुळे पिण्याचे पाणी व रब्बी शेतीसाठी पाणी याच धरणावर अवलंबून असते या धरणाकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते
या जलपूजनासाठी पाटबंधारे खात्याचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे उपस्थित राहणार आहेत

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *