अकोले तालुक्यातील देवठाण येथील महादेव मंदिर देवस्थान जमिनीत क्षेत्रात गुरव समाजाच्या पुजाऱ्यांची नावे दाखल झाल्याचे तलाठी कडून समजले आहे त्याचबरोबर ग्रामपंचायत मालकीच्या सर्वे नंबर २५९ मधील दहा गुंठे जमीन मुस्लिम समाज बांधवांच्या कब्रस्तान साठी मुस्लिम समाजाच्या नावावर करण्यात आले आहे तलाठी यांनी नावे सातबारा उताऱ्यावर दाखल केले आहेत

देवठाण गावातील ग्रामपंचायतच्या जमिनीतील आणि देवस्थानच्या जमिनीचे मालकी आज संपुष्टात आली आहे इतके मोठे निर्णय होत असताना तलाठी आणि ग्रामसेवक यांनी ग्रामस्थांच्या कानावर घातल्यानंतरच नोंदी करायला पाहिजेत नोंदी करून त्या मंजूर केल्यानंतर लोकांना माहिती मिळते त्यामुळे जमीन द्यायची की नाही हे ग्रामस्थ ठरवणार आहेत आणि ग्रामस्थांच्या आणि ग्रामसभेच्या पेक्षा कोणीही मोठा नसतो परंतु किमान या गोष्टी गावाला माहीत असल्या पाहिजेत

गावातील ग्रामस्थांनी याबाबत विचार करून योग्य ती निर्णय घ्यावा गावाला माहीत असावेत याकरिता सर्वांनी माहिती स्वतः मिळवावी असे ग्रामस्थांचे मत आहे

 

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *