समशेरपुर प्रतिनिधी
शांताराम दराडे व शिवाजी पाटोळे
अकोले तालुक्यातील समशेरपुर जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात विकास कामांसाठी निधी दिला असून कोणतेही गाव निधी वाचून वंचित राहणार नाही याची काळजी मी लोकप्रतिनिधी म्हणून घेत आहे प्रत्येक गावात सुरू असलेली विकास कामे ठेकेदार व्यवस्थित करतात की नाही यावर गावकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे परिसरातील सरपंच उपसरपंच व नागरिक यांनी या कामांवर बारीक लक्ष ठेवावे कामे दर्जेदार व्हावीत यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी केले आहे
समशेरपुर पासून तुम्हीच खांडपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करणे व डांबरीकरण करणे या कामाचा भूपूजन शुभारंभ आमदार लहामटे यांचे शुभहस्ते करण्यात आला यावेळी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व जिल्हा सहकारी बँकेचे संचालक सिताराम पाटील गायकर व राष्ट्रवादी काँग्रेस नअजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष शरद चौधरी उपस्थित होते
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे खास कृपेमुळे मला अकोले तालुक्यातील विकास कामे करण्यासाठी भरपूर निधी मिळाला त्यामुळे मी विकास कामे करू शकलो मध्यंतरीच्या काळात मंजूर असलेली विकास कामे होऊ नयेत म्हणून राज्य सरकारने या कामांना मनाई आणली होती त्यामुळे अकोले तालुक्यातील अनेक कामे या स्टे मुळे रखडली होती परंतु तो, स्टे ती मनाई न्यायालयाकडून उठवण्यात आले त्यामुळे ती म्हणणारी मुळे अडकलेली कामे पुन्हा सुरू झाली आहेत असा दावा आमदार लहामटे यांनी केला आहे
याप्रसंगी जिल्हा बँक संचालक सिताराम पाटील गायकर अहमदनगर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पोपट दराडे यांची समयोचित भाषणे झाली या कार्यक्रमाला शिवाजी पाटोळे मधुकर बिन्नर शंकर सदगीर सुभाष बेनके बबन सदगीर अशोक एखंडे डॉ मनोज मोरे शरद चौधरी ईश्वर वाकचौरे लक्ष्मण दशरथ एखंडे संजय बिन्नर सुधीर शेळके सुनील दराडे जालिंदर बोडके प्रथमेश सहाणे अरुण कराड परसराम शेळके हरिदास जोरवर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोपट दराडे यांनी तर आभार सचिन दराडे यांनी मानले
