देवठाण येथे कुणबी दाखल्यासाठी महसूल कडून शिबिराच्या आयोजन तर मराठा बांधवांकडून उत्तम प्रतिसाद
देवठाण प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील मराठा समाजातील लोकांना कुणबी दाखले मिळावेत म्हणून अकोले तहसील कार्यालयाकडून देवठाण गावी आज शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या शिबिराला गावातील मराठा बांधवांनी उत्तम प्रतिसाद दिला
नवीन तहसीलदार सिद्धार्थ मोरे हे बदलून आल्यानंतर मराठा बांधवांना कुणबी दाखले काढता यावे म्हणून गावोगावी शिबिराचे आयोजन करण्यात आले तत्पूर्वी तहसीलदार मोरे यांनी महसूल मंडळ अधिकारी कामगार तलाठी व सेतू चालक यांची बैठक घेऊन याबाबत सूचना व आदेश दिले होते
त्या आदेशानंतर देवठाण गावचे कामगार तलाठी प्रतीक ठाणेकर यांनी आज ग्रामपंचायतच्या सभागृहात कुणबी दाखल्यांचे शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरासाठी सेतू चालक प्रवीण सहाने हे उपस्थित होते देवठाण गावातील शेतकऱ्यांनी आपले मोडीतील पुरावे शेतीच्या वारसाचे फेरफार आणि वंशावळ सेतू चालकाकडे सादर केले जवळपास 50 पेक्षा जास्त मराठा बांधवांनी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी आपले अर्ज दाखल केले आहेत या अर्जाची छाननी कामगार तलाठी प्रतीक ठाणेकर व महसूल मंडळ अधिकारी शिरीष कुलकर्णी हे करणार असून त्यांच्या तपासणीनंतर सेतू चालक प्रवीण सहाने यांच्या सेतू मधून दाखले मिळण्यासाठी प्रस्ताव अपलोड करण्यात येणार आहे
अनेक दिवसापासून काही शेतकऱ्यांना कुणबीची दाखले मिळण्याचे पुरावे मिळत नव्हते परंतु मध्यंतरी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर गावोगावी मोडी लिपीतील पुरावे शोधून तलाठी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आले त्याप्रमाणे देवठाण येथील तलाठी कारल्याच्या नोटीस बोर्डावरील काही प्रमाणात माहिती चिटकवण्यात आली होती त्या पुराव्यांचा आधार घेऊन मराठा बांधवांनी जात प्रमाणपत्रासाठी आज आपले प्रस्ताव सादर केले आहेत
