देवठाण प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील देवठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या प्राणांगणात आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपये रंगमंच स्टेज साठी दिले असून त्या कामाची प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे आज दिनांक 24 जानेवारी 2024 सकाळी दहा वाजता प्राथमिक शाळेच्या प्राणांगणात भूमिपूजन समारंभ होणार असल्याची माहिती शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन कथले व इतर सदस्यांनी दिली आहे

श्री नितीन कथले व ग्रामस्थांनी गेल्या 24 फेब्रुवारी 2023 रोजी आमदार महोदयांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांची भेट घेऊन शाळेसाठी रंगमंचाची मागणी केली होती त्याचवेळी आमदारांनी रंगमंच देण्याचे कबूल केले होते त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला असून सदर कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे ठेकेदार निश्चित झाला आहे त्यामुळे आज कामाचे भूमिपूजन आमदार महोदयांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाला देवठाण गावचे सरपंच निवृत्ती जोरवर व शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत अशी माहिती शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने देण्यात आली आहे

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *