आढळा सांगवी पाडोशी या धरणातील पाण्याचे व्यवस्थित नियोजन करा आमदार लहामटे यांच्या पाटबंधारे अधिकाऱ्यांना सूचना

देवठाण प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील आढळा सांगवी व पाडोशी या तिन्ही धरणांचे रब्बी पिकाचे नियोजन पाटबंधारे अधिकारी व कर्मचारी यांनी व्यवस्थित करावे शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी केल्या आहेत

आढळा धरण कालवा सल्लागार समितीची नुकतीच अकोले विश्राम गृहावर बैठक संपन्न झाली यावेळी बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून आमदार लहामटे बोलत होते याप्रसंगी अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे व अकोले पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता योगेश जोर्वेकर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शरद चौधरी हे उपस्थित होते

प्रकल्पांतर्गत अकोले तालुक्यातील देवठाण विरगाव हिवरगावआंब्रे डोंगरगाव पिंपळगावनिपाणी गणोरे ही सहा गावे तसेच संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा जवळेकडलग धांदरफळ निमगाव भोजापूर चिकणी पिंपळगावकोंझिरा राजापूर तसेच सिन्नर तालुक्यातील कासारवाडी या गावातील एकूण 3913 हेक्टर क्षेत्र लाभक्षेत्रात येते उजव्या कालव्याच्या अंतर्गत 2422 तर डाव्या कालव्याच्या अंतर्गत 1491 हेक्टर क्षेत्र येते या धरणाची क्षमता 1060 दलघफु इतकी आहे धरणाचा मृत साठा 85 दलघफू आहे आज 19 जानेवारी 2024 रोजी धरणामध्ये 977 दलघफू पाणी शिल्लक आहे

आढळा धरणाच्या चाऱ्या फॉल आउटलेट यासारख्या कामांसाठी चार कोटी 90 लाख रुपये मंजूर असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे परंतु धरणाच्या लाभक्षेत्रातील देवठाण गावात यातील एक रुपया खर्च केलेला नसल्याने तेव्हा शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली याशिवाय निळवंडे व आढळा या दोन्ही धरणाचे शेतीसाठी पाणी घेणाऱ्या संगमनेर तालुक्यातील त्या आठ गावांना वगळण्यात यावे या गावांनी कोणत्यातरी एकाच धरणाचे पाणी घ्यावे अशी मागणी अकोले तालुक्यातील सहा गावातील शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे केली याशिवाय आढळा जलाशयातून शेतीसाठी ठिबक सिंचन पाणी परवानग्या देण्यास पाटबंधारे खाते टाळाटाळ करते ती करू नये अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली पाण्याची नियोजन व्यवस्थित करावे जल जीवन च्या कामासाठी आढळा धरण रिकामे करू नये असेही शेतकऱ्यांचे म्हणणे होते

या बैठकीसाठी पाटबंधारे खात्याची शाखा अभियंता रजनीकांत कवडे कालवा निरीक्षक मयूर देशमुख डोंगरगाव चे सरपंच दशरथ उगले अमृतसागर दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटोळे समशेरपुर चे सरपंच एकनाथ मेंगाळ दूध संघाचे माजी उपाध्यक्ष पोपट दराडे केळी रोमनवाडी चे माजी सरपंच मधुकर बिन्नर अमृता गोडे सुधीर शेळके सुनील उगले सुनील दराडे केशव बोडके ईश्वर वाकचौरे अक्षय आभाळे नगरसेवक नवनाथ शेटे वाल्मीक देशमुख बबनराव सदगीर आधी जण उपस्थित होते

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *