देवठाण  प्रतिनिधी

 

आढळा धरण सांगवी धरण व पाडोशी धरण या तीन धरणाच्या लाभक्षेत्रातील अधिकाऱ्यांची व शेतकऱ्यांची संयुक्त बैठक अकोले चे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याची माहिती अकोले पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता योगेश जोर्वेकर यांनी दिली

सांगवी व पाडोशी या दोन्ही धरणातून सावरगाव समशेरपुर घोडसरवाडी टाहाकारी केळी रुमणवाडी सांगवी आणि पाडोशी या शेतकऱ्यांना या दोन्ही धरणांच्या पाण्याचा रब्बी साठी उपयोग होतो

तसेच आढळा मध्यम प्रकल्पातील पाण्याचा देवठाण हिवरगाव डोंगरगाव पिंपळगाव गणोरे आणि विरगाव ही अकोले तालुक्यातील सहा गावे त्याचबरोबर संगमनेर तालुक्यातील वडगावलांडगा  पिंपळगावकोंझिरा जवळेकडलग धांदरफळ चिकणी निमगावभोजापूर राजापूर चिखली ही संगमनेर तालुक्यातील आठ गावे याशिवाय सिन्नर तालुक्यातील कासारवाडी व नळवाडी या गावातील शेतकऱ्यांना आढळा धरणाचा शेतीसाठी उपयोग होतो

या विभागाचे लोकप्रतिनिधी आढळा धरणा च्या लाभक्षेत्रात येणाऱ्या विभागातून निवडून गेलेले आमदार डॉक्टर किरण लहामटे, आमदार बाळासाहेब थोरात आणि खासदार सदाशिव लोखंडे या सर्व लोकप्रतिनिधींना आढळा धरणाच्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीला निमंत्रित करण्यात आले आहे

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *