
देवठाण प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील देवठाण येथील खंडोबा मंदिर परिसर पर्यटन विकास योजनेतून दोन कोटी रुपयाचे कामे मंजूर झाले असून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली तसेच गणेश खिंड येथे 50 लाख रुपये खर्चाचा रस्ता मंजूर झाला असून त्याचे भूमिपूजन आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती सुहास कर्डिले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पर्यटन संचालनालयाचे उपकार्यकारी अभियंता ज्ञानेश्वर पवार हे प्रमुख पाहुणे होते
यावेळी बोलताना डॉ ल्हामटे म्हणाले की देवठाण गावच्या विकासासाठी मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले जास्तीत जास्त निधी देवठाण गावाला आणून दिला अप्रत्यक्ष कामे सुरू झाली अनेक कामे पूर्ण झाली देवठाण हे गाव राजुर कोतुळ प्रमाणे मध्यवर्ती ठिकाण व एक चांगली बाजारपेठ निर्माण होण्यासाठी गावात विविध सुविधा विशेषतः दळणवळणाचे मार्ग तयार होणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी प्रथम अकोले देवठाण या रस्त्याच्या कामापासून सुरुवात केली व तो रस्ता केला गेल्या पाच वर्षापासून प्रत्येक वर्षी मी आढळला धरणाचे जल पूजनासाठी आल्यावर येथील श्री खंडोबा महाराजांचे दर्शन घेऊन जायचं तेव्हापासूनच मनामध्ये इच्छा होती की या देवस्थानासाठी काही रक्कम ठेवून परिसराचा विकास करावा त्याप्रमाणे दोन कोटी निधी पर्यटन विभागाकडून मिळून दिला
यावेळी प्रास्ताविक व सूत्रसंचालन शिवाजी पाटोळे यांनी केले यावेळी देवठाण येथील श्री खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या वतीने आमदार महोदय व इतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर शेळके देवठाण चे सरपंच निवृत्ती जोरवर कामगार पोलीस पाटील राधाकृष्ण जोरवर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अक्षय आभाळे जालिंदर बोडके नवनाथ बोडके आदी मान्यवर उपस्थित होते
