देवठाण,चे सरपंच पदी विजया सहाने बिनविरोध

देवठाण प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेले देवठाण गावच्या सरपंच पदी सौ. विजया अनिल सहाने यांची बिनविरोध निवड झाली आहे

माजी सरपंच निवृत्ती जोरवर यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंच पदाची निवड करण्यात आली जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशानुसार तहसीलदार अकोले यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विरगाव चे महसूल मंडळ अधिकारी बाबासाहेब दातखिळे यांची नियुक्ती केली होती

निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब दातखडे यांनी आज दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता त्यानुसार सर्व सदस्यांच्या उपस्थितीत सौ विजया अनिल सहाने यांनी सरपंच पदासाठी अर्ज भरला निर्धारित केलेल्या वेळेत सौ सहाणे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केले

माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके यांच्या नेतृत्वाखाली असलेली ग्रामपंचायत माजी आमदार वैभवराव पिचड त्याच्या ताब्यात आहे

सर्वांना संधी मिळावी या हेतूने गेल्या चार वर्षात चार जणांना सरपंच पदाची संधी देण्यात आली आहे त्यामध्ये प्रथमता केशव अर्जुन बोडके दुसऱ्यांदा सौ भारती किरण शेळके व तिसऱ्यांदा निवृत्ती विश्वनाथ जोरवर या तिघांना यापूर्वी संधी देण्यात आली होती

त्यानंतर आता चौथ्यांदा आज विजया सहाणे यांना संधी देण्यात आली आहे विजया सहाणे यांची निवड व्हावी म्हणून देवठाण चे माजी उपसरपंच किसन काकड यांनी जोरदार फील्डिंग लावली होती सर्व ग्रामपंचायत सदस्यांना व सत्ताधारी जनसेवा मंडळाच्या नेतेमंडळींना एकत्रित ठेवण्यास किसन काकड यांचा मोलाचा सहभाग होता

सौ विजया सहाने यांच्या निवडीबद्दल सर्व ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे ,अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशोकबाबा शेळके,माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके ,अकोले तालुका देखरेख संघाचे माजी अध्यक्ष मोहनबाबा शेळके, अमृतसागर दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटोळे, अगस्ती कारखान्याचे विद्यमान संचालक सुधीर अण्णा शेळके , पंचायत समितीचे माजी सभापती सुहास कर्डिले, अकोले बाजार समितीचे माजी चेअरमन चंद्रमोहन निरगुडे,बाजार समितीचे विद्यमान संचालक अब्दुल इनामदार, पंचायत समितीच्या माजी सदस्य सौ सीताबाई पथवे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड तुळशीराम कातोरे, देवठानचे माजी सरपंच एकनाथ सहाने, शिवसेना उबाठा गटाचे आढळा विभाग प्रमुख अजय शेळके, देवठाण सोसायटीचे संचालक शिवसेना नेते राम सहाने, जनलक्ष्मी सहकारी पतसंस्थेचे संचालक केशव बोडके यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत

याप्रसंगी ग्रामसेवक श्री उपरे व कामगार तलाठी श्री गडाख व ग्रामपंचायत लिपिक अरुण पुरी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी श्री दातखिळे यांना सहकार्य केले नवनिर्वाचित सरपंच सौ सहाने यांचा सर्वांच्या वतीने शाल श्रीफळ नारळ हार गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *