देवठाण येथील दहा लाखांचे सभामंडपाचे भूमिपूजन

शिर्डी लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या निधीतून मंजूर झालेली दहा लाख रुपयाचे सभा मंडपाचे कामाचा भूमिपूजन समारंभ नुकताच संपन्न झाला
योगी केशव बाबा चौधरी व अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक अशोकबाबा शेळके यांच्या शुभ हस्ते भूमिपूजन संपन्न झाले
माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी देवठाण व विरगाव येथे सभामंडप मंजूर केले होते परंतु आचार संहितेमुळे काम सुरू झाले नव्हते आता विधानसभा निवडणूक संपल्यावर संबंधित कामे ठेकेदार व ग्रामपंचायत पदाधकाऱ्यांच्या उपस्थितीत या भूमिपूजन संपन्न झाले
याप्रसंगी देवठानचे सरपंच निवृत्ती जोरवर, माजी प.स. सदस्य अरुण शेळके, माजी सरपंच केशव बोडके माजी उपसरपंच आनंदा गिऱ्हे, सुभाष सहाने, किसन काकड, बाळासाहेब गायकवाड,आदिजन उपस्थित होते
