
विरगाव प्रतिनिधी ज्ञानेश्वर खुळे
अकोले विधानसभा निवडणूकीत कार्यसम्राट आमदार डॉ.किरण लहामटे यांनी दुस-यांदा विजय मिळविल्याबद्दल देवठाण जि.प.गटातील कार्यकर्त्यांनी नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.जि.प.अहमदनगरचे गटनेते आणि भाजपाचे प्रदेश सदस्य जालिंदर वाकचौरे यांचे गटातून आमदार डॉ.किरण लहामटे यांना निर्णायक आघाडी मिळाल्याने त्यांचा विजय सुकर झाला.या सत्कारावेळी भाजपाचे प्रदेश सदस्य जालिंदर वाकचौरे, दिनकर थोरात, नामदेव कुमकर, सुभाष कुमकर,वाल्मिक देशमुख,संजय थोरात, संदीप आस्वले, राजाराम कुमकर, सोमनाथ आगिवले यांचे सहित अनेकजण उपस्थित होते.आगामी मंत्रीमंडळात त्यांचा समावेश व्हावा अशा शुभेच्छाही त्यांना यावेळी उपस्थितांनी दिल्या.देवठाण जि.प.गटातर्फे लवकरच आमदार डॉ.किरण लहामटे यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करणार असल्याचे जालिंदर वाकचौरे यांनी सांगितले.
