देवठाण प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील देवठाण येथे नुकतीच विद्यमान आमदार डॉ किरण लहामटे यांची प्रचार सभा पार पडली लवकरच राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे नेते आमदार रोहित पवार यांची सभा देवठाण मध्ये होणार असल्याची चर्चा आहे सभेची नुकतीच तयारी सुरू झाली असून तालुका अध्यक्ष सुरेश गडाख यांनी जागेची पाहणी केली

आमदार डॉ. लहामटे यांनी देवठाण गावामध्ये अनेक विकास कामे केल्याने त्यांची विकास कामामुळे मतं मिळतील अशी अपेक्षा आहे विकास कामाचा प्रचार आणि प्रसार जनतेत कितपत होतो व विद्यमान आमदारांची कार्यकर्ते वाडीवस्तीत जाऊन प्रचार यंत्रणा कशी राबवतात यावर बरेच अवलंबून आहे याशिवाय अनेक जुने जाणते व प्रभावी कार्यकर्ते अद्याप पर्यंत प्रचारात अगर प्रचार सभांमध्ये सामील झालेले दिसत नाहीत जोपर्यंत सामील होत नाहीत तोपर्यंत विद्यमान आमदारांना देवठाण गावातील परिस्थिती व गटबाजी सुधारावी लागणार आहे तरच एक नंबरची सर्वाधिक मते देवठाण गावात मिळतील सर्वांना सोबत घेऊन एकत्रित मोट बांधून कामाला लावले पाहिजे या गोष्टी शक्य आहे अन्यथा अनेक विकास कामे करूनही विद्यमान आमदारांना देवठाण मध्ये अपेक्षा भंग होऊ शकतो देवठाण गावात सिताराम पाटील गायकर आणि जालिंदर वाकचौरे यांना मानणारे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत श्री गायकर व श्री वाकचौरे यांना देवठाण मध्ये लक्ष घालावे लागणार आहे गाव मोठे असल्याने एकट्याच्या भरवशावर राहून चालणार नाही त्यांना सर्वांची साथ मिळणे गरजेचे आहे

माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या ताब्यात देवठाण ग्रामपंचायतचे सत्ता असून 17 पैकी 16 सदस्य पिचड गटाचे आहेत याशिवाय देवठाण विविध कार्यकारी सोसायटीमध्ये 13 पैकी सहा सदस्य पिचड गटाचे असल्याने वाडीवस्तीत माजी आमदार पिचड यांचे कार्यकर्ते विखुरलेले आहेत पिचड गटाचे कार्यकर्ते किती फिल्डींग लावतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे फिल्डिंग व्यवस्थित लावली तर देवठाण गावात माजी आमदार पिचड यांना सर्वात जास्त मते मिळू शकतात कारण स्थानिक संघटन चांगले असून त्यांचे नेतृत्व करणारा कार्यकर्ता सातत्याने धडपड करीत असतो असे आज तरी वातावरण आहे

आजी-माजी आमदारांचे किती मोठे संघटन असले किंवा विकास कामे केली असली तरी देवठाण गावातील 6734 मता पैकी 50 टक्के मतदान आदिवासी ठाकर समाजाचे आहे यावेळेस आदिवासी ठाकर समाजाच्या वतीने पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी उमेदवारी कायम ठेवल्यामुळे आदिवासी ठाकर समाजामध्ये मारुती मेंगाळ यांना मतदान देण्याचा कल दिसत आहे जात फॅक्टर वर मतदान झाले तर मारुती मेंगाळ यांना कुठल्याही प्रकारचा खर्च न करता मोफत भरघोस मते मिळू शकतात 6734 मतापैकी किमान 2000 मध्ये मारुती मेंगाळ एकट्या देवठाण गावात मिळू शकतात तरुणांची असलेली ठाकर समाजातील फळी व मारुती मेंगाळ यांचे विषयी असलेले आकर्षण व सातत्याने देवठाण गावामध्ये असलेले सुखदुःखाच्या कार्यक्रमात असलेली उपस्थिती त्यांना महत्व मिळवून द्यायला कारणीभूत ठरू शकते

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमित भांगरे यांना मतदानासाठी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या नेतेमंडळीवरच भिस्त ठेवावे लागत आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष इंदिरा काँग्रेस व शिवसेना उबाठा या तिन्ही मित्र पक्षांचांगले संघटन असल्याने महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अमित भांगरे यांना चांगल्यापैकी मतदान घडून आणू शकतात राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात नसले तरी भांगरे कुटुंबांला मानणारा मोठा वर्ग अनेक दिवसापासून कुटुंबासाठी कार्यरत आहे महाविकास आघाडीकडे देवठाण गावात चांगल्यापैकी कल दिसून येत असून आता त्याचे मतात किती परिवर्तन होते हे भविष्य काळात दिसून येईल

आज तरी लहामटे पिचड भांगरे मेंगाळ हे चारही उमेदवार मत मिळवण्यास देवठाण गावात चांगल्यापैकी या आघाडी घेत असून चारही उमेदवारांना देवठाण गावात आपल्यालाच एक नंबरची मते मिळतील अशी अपेक्षा त्या त्या पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *