देवठाण प्रार्थमिक शाळेत बाल आनंद मेळावा संपन्न

अकोले तालुक्यातील देवठाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बाल आनंद मेळावा व शालेय प्रवेश उत्सव संपन्न झाला

या बाल आनंद मेळाव्याच्या निमित्ताने शाळेतील लहान मुलांनी आपापले दुकाने थाटली होती या निमित्ताने बाल आनंद बाजार अत्यंत उत्साहाच्या वातावरणात भरवण्यात आला. यावेळी शालेय प्रवेश उत्सवही संपन्न झाला, या बाल आनंद बाजारात गावातील ग्रामस्थ नेतेमंडळी व पालक यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन लहान लहान मुलांच्या विक्रीसाठी आलेल्या वस्तू खरेदी केल्या

या कार्यक्रमाचे उद्घाटन देवठाण गावच्या सरपंच सौ विजया सहाने यांनी केले

या कार्यक्रमाला देवठाण विविध कार्य सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन सुभाष दराडे, देवठाण केंद्राच्या केंद्रप्रमुख स्वाती अडाणे, जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम अभियंता सौ अतिशा पवार, देवठाण गावचे पोलीस पाटील राधाकृष्ण जोरवर, अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर शेळके, पंचायत समितीचे माजी सदस्य अरुण शेळके,अमृतसागर दूध संघाची माजी संचालक शिवाजी पाटोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन कथले, उपाध्यक्ष प्रवीण सहाने,शिक्षण तज्ञ सचिन बोडके,
किरण शेळके , सोमनाथ शेळके, सुहास काकड, इर्शाद मनियार, विक्रम शेळके, योगेश काकड, प्रवीण जाधाव,, संजय गायकवाड, रेखा कांबळे, अश्विनी पवार, मंगला घोलप, विलास शिंदे , धनराज वाकचौरे, प्राजक्ता मोटे , रुखसार मणियार, आदी मान्यवरांनी या बाल आनंद सोहळ्यामध्ये उत्साहाने सहभाग घेतला

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *