आमदार डॉ किरण लहामटे व मारुती मेंगाळ देवठाणला एका व्यासपीठावर येणार

देवठाण प्रतिनिधी

अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे व आदिवासी ठाकर समाजाचे नेते माजी उपसभापती मारुती मेंगाळ देवठाण येथील एका कार्यक्रमात एकत्र येणार आहे

वीज वितरण कंपनीचे लाईनमन दिनकर धर्मा पथवे हे सेवानिवृत्त होत असून सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमास दोडकनदी परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात या कार्यक्रमाला हे दोघही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत

विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी मारुती मेंगाळ यांनी उमेदवारी करून तालुक्यात खळबळ उडून दिली होती त्यांच्या उमेदवारीमुळे विद्यमान आमदार लहामटे व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्यापुढे मोठे आव्हान उभे राहिले होते

विधानसभा निवडणुकीपासून आजपर्यंत आमदार डॉ किरण लहामटे व मारुती मेंगाळ एका व्यासपीठावर आलेले नव्हते पहिल्यांदाच देवठाण येथे एका व्यासपीठावर येत आहेत

महावितरण मध्ये सेवानिवृत्त झाल्यामुळे श्री पथवे कुटुंबाने हा सत्कार समारंभ आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता नामदेव शेळके आणि सहाय्यक अभियंता प्रीतम परिहार तसेच अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर शेळके मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ तुळशीराम कातोरे देवठाणाचे माजी सरपंच एकनाथ सहाने अमृतसागर दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटोळे माजी उपसरपंच आनंदा गिरे आधी जण उपस्थित राहणार आहेत

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *