देवठाण येथे ग्रामस्थांनी दारू पकडली
मात्र आरोपी फरार पोलिसांचा तपास सुरू

देवठाण प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील देवठाण येथे अवैध दारू विक्री करीत असताना ग्रामस्थांनी दारू विक्री करणाऱ्याला मुद्देमाला सहपकडले पकडलेली दारू पोलिसांच्या ताब्यात दिली असून आरोपी व त्याचा साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले आहे
देवठाण मधून आढळा धरणाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शेजारी इंदिरानगर अंगणवाडीच्या पाठीमागे माध्यमिक विद्यालयाच्या व जुनिअर कॉलेजच्या रस्त्यावर खुलेआम दारू विक्री केली जाते अशी खबर ग्रामस्थांना होती
दारूबंदीचे कार्यकर्ते कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी शुक्रवारी सकाळी नऊ वाजता अवैध दारू विक्री करणारा इसम व त्याचा साथीदार यांना देशी व विदेशी दात विक्री करताना पकडले त्यावेळी ग्रामस्थांत मोठा जमाव गोळा झाला त्या जमावाच्या गरड्यातून आरोपी व साथीदार दोघेही प्रसार झाले
कॉमेडी तुळशीराम कातोरे युवा अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधीर शेळके व इतरांनी ही बाब पोलिसांना कळवली पोलीस कॉन्स्टेबल कैलास घुले व कॉन्स्टेबल अविनाश गुडघे ही घटनास्थळी आले त्यांनी पंचनामा केला याप्रसंगी पोलीस पाटील राधाकृष्ण जोरवर ही सुद्धा उपस्थित होते
याप्रसंगी सुधीर शेळके अनिल साने जालिंदर बोडके एडवोकेट विजय आव्हाड अशोक येलमामे महेश सोनवणे संभाजी नागरे दिलीप जोरवर हेमापत्रे उपस्थित होते
