देवठाण प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील देवठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन सुभाषराव दराडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या सभेमध्ये अनेक महत्त्वाचे विषय चर्चिले गेले

सोसायटीच्या इमारतीचे बांधकाम चे भूमिपूजन दीड वर्षांपूर्वी झाले भव्य दिव्य अशी इमारत उभी राहील असे सभासदांना वाटले होते परंतु इमारतीची बांधकाम जवळजवळ बारगळल्यात जमा आहे म्हणून गतवर्षी सभासदांना वाटण्यात येणारा नफा
सर्व सभासदांनी इमारत बांधकामासाठी दिला होता परंतु चालू वर्षी मात्र हा नफा इमारत बांधकामात देण्यास सभासदांनी विरोध दर्शवला असून सर्व नफा सभासदांना वाटून देण्यात यावा अशी अनेक सभासदांनी मागणी केली

सोसायटीकडून कर्ज घेतलेल्या सर्व कर्जदार सभासदांचे पूर्ण विमा उतरण्याचे धोरण असल्याचे सचिव शांताराम जोरवेकर यांनी सांगितले त्यावर काही सभासदांनी कर्जदार सभासदांना बरोबरच बिगर कर्जदार सभासदांचाही वार्षिक विमा उतरावा असे म्हणणे मांडले संस्थेच्या संचालकांनी सभासदांचे प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्याचा प्रयत्न केला

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *