देवठाण गावातील महावितरण च्या विविध मागण्या मार्गी लावू असे आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिले
देवठाण प्रतिन
अकोले तालुक्यातील देवठाण येथील महावितरण संदर्भातील सर्वच्या सर्व प्रश्न मार्गी लावू अशी आश्वासन राज्याच्या ऊर्जा राज्यमंत्री नामदार मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांनी दिले आहे
अनेक वर्षापासून महावितरणच्या संदर्भातील देवठाण गावातील विविध समस्यां प्रलंबित आहेत त्या सर्व मार्गी लागाव्यात म्हणून अकोले तालुका शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख शिवाजी पाटोळे यांनी नुकतीच मुंबई येथे मंत्रालयात नामदार मेघना ताई बोर्डीकर यांची भेट घेऊन निवेदन दिले या निवेदनासोबत अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांचे शिफारस पत्र मंत्री महोदया यांना देण्यात आले
जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मारुती मेंगाळ यांनीही राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटून देवठाण च्या विविध समस्यांबाबत त्वरित मार्ग काढण्यात यावे असे निवेदन देवेंद्र फडवणीस व एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन आग्रह धरला आहे
देवठाण गावातील पेट्रोल पंपापासून तर नालंदा नगर पर्यंत रस्त्याच्या कडेने गावठाण लाईन टाकण्यात यावी विरगाव पासून तर धबधबा वाडी पर्यंत शेतीसाठी लिंक लाईट टाकून गणेश किंग च्या कांदा पीक व रब्बी पीक च्या वेळी होणारी गैरसोय अडचण त्वरित दूर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली
याशिवाय आदिवासी वाडी वस्तीवर घरांसाठी आदिवासी विकास खात्याअंतर्गत असलेल्या निधीतून विद्युतीकरण करण्यात यावे मेंगाळवाडी येथे नवीन ट्रांसफार्मर बसवण्यात यावा तसेच गावा मध्ये शेतीसाठी असलेले रोहित्र कायदेशीर ओव्हरलोड झालेले आहेत अशा ओव्हरलोड झालेल्या रोयात्रांजवळ एक एक असे संपूर्ण गावात वीस नवीन ट्रांसफार्मर बसवण्यात यावेत अशी ही मागणी करण्यात आली आहे या संदर्भात आमदार लहामटे, जालिंदर वाकचौरे, मारुती मेंगाळ, शिवाजी पाटोळे सुधीर शेळके आनंदा गिऱ्हे आधी जण जोरदार प्रयत्न करीत आहेत
देवठाण सब स्टेशनचा जागेचा प्रश्न ग्रामपंचायत ने सोडवला असल्याने ग्रामपंचायतीकडून महावितरण च्या नावे जमीन क्षेत्र हस्तांतरित झाल्यावर लागलीच सब स्टेशनचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन नामदार बोर्डीकर यांनी दिले आहे
