लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाल्यामुळे देवठाणे येथील महिला आक्रमक येत्या गुरुवारी तहसील कचेरीवर मोर्चा नेणार
देवठाण प्रतिनिधी शिवाजी पाटोळे
अकोले तालुक्यातील देवठाण येथील लाडक्या बहिणींना चालू असलेले राज्य सरकारचे पैसे काही महिलांना येण्याचे बंद झाल्याने देवठाण येथील महिला आक्रमक झाल्या असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जनवादी महिला संघटनेच्या वतीने अकोले तहसील कार्यालयावर येत्या 18 सप्टेंबर 2024 मोर्चा काढणार असल्याची माहिती जनवादी महिला संघटनेच्या तालुकाध्यक्ष श्रीमती सुमन इरणक यांनी दिली आहे
देवठाण येथील बैलांना पैसे बंद झाले तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे एका रेशन कार्डावर दोनच महिलांना पैसे सुरू राहणार असून दोन पेक्षा जास्त महिला ज्या रेशन कार्ड वर आहेत त्यांचे पैसे बंद झाले आहे वास्तविक आदिवासी समाजामध्ये शिधापत्रिकांचे विभाजन झालेले नसल्यामुळे एका एका कुटुंबात वीस पंचवीस तीस इतके लोक सात आठ दहा महिला कुपरावर दाखवण्यात आले आहेत त्यामुळे फक्त दोनच महिलांना पैसे मिळत मिळणार असल्याने बाकीच्या महिला नाराज झाल्या आहेत
त्यामुळे येत्या 18 सप्टेंबर 2024 रोजी जास्तीत जास्त महिलांनी अकोले तहसील कार्यालयावर मोर्चासाठी हजर राहावे असे आव्हान संघटनेच्या कार्यकर्त्या जुबेदा मणियार व अनिता साबळे यांनी केले आहे याप्रसंगी देवठाण येथील असंख्य महिला उपस्थित होत्या
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ तुळशीराम कातोरे यांची वन हक्क समितीचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार जनवादी महिला संघटनेच्या वतीने करण्यात आला
