देवठाण प्रतिनिधी

शिर्डी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने संकल्प सभेचे अकोले मध्ये आयोजन करण्यात आले होते यावेळी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार डॉक्टर किरण लहामटे आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना एका व्यासपीठावर आणून महायुती अकोले तालुक्यात एकत्र आहे असे दाखवण्याचा खासदार लोखंडे यांचा प्रयत्न यशस्वी झाला आहे

शुक्रवारी राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सामंत व बांधकाम मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादा भुसे व राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व महावतीचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांचे उपस्थितीत अकोले शहरातील श्रीमंत मंगल कार्यालयामध्ये संकल्प मेळावा संपन्न झाला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री मधुकरराव पिचड हे होते याप्रसंगी आमदार डॉक्टर किरण लहामटे माजी आमदार वैभवराव पिचड अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सिताराम पाटील गायकर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे आणि भाजप भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदेतील गटनेते जालिंदर वाघचौरे उपस्थित होते

यावेळी बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की अकोले तालुक्यासाठी एक नवीन एमआयडीसी निर्माण करण्यात यावी अशी मागणी आमदार डॉक्टर किरण लहामटे हे बऱ्याच दिवसा पासून पाठपुरावा करीत आहे आज आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही एमआयडीसीची मागणी केली आहे लोकसभेची निवडणुक आचारसंहिता संपल्यावर राज्य पातळीवरील एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांची लवकरच एक बैठक लावण्यात येईल या बैठकीला या विभागाचे पालकमंत्री खासदार व आमदार यांना बोलावण्यात येईल आणि या बैठकीमध्ये लवकरात लवकर निर्णय घेऊन एमआयडीसीला मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन उद्योग मंत्री सामंत यांनी दिले

नामदार राधाकृष्ण विखे पाटील बोलताना म्हणाले की आपल्या जिल्ह्यातील काही पुढारी स्वतःला काँग्रेस पक्षाचा राज्याचा नव्हे तर देशाचा नेता समजतात परंतु या नेत्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये दोन पैकी एकही जागा लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाला मिळवता आली नाही यावरून त्यांचे पक्षात किती वजन आहे हे समजून आलेले आहे असा टोला आमदार बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता नामदार विखे यांनी लावला आहे

नामदार दादा भुसे बोलताना म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहोत आम्ही व खासदार लोखंडे यांनी शिंदे यांना साथ दिली आहे म्हणून खासदार लोखंडे यांना शिर्डीतून तिकीट देण्यात आलेल आहे खासदार लोखंडे यांचे कार्य अतिशय उल्लेखनीय असून तीन वेळा आमदार कर्जत जामखेड मधून तर दोन वेळा खासदार शिर्डी मतदार संघातून झालेले आहेत मतदार संघातील जनतेने प्रचंड मतांनी निवडून द्यावे असे आव्हान नामदार भुसे यांनी केले आहे

या सभेला संबोधित करताना अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे हे म्हणाले की राज्यांमध्ये उपमुख्यमंत्री मंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असून महायुती सरकारच्या माध्यमातून अजित पवार यांनी अकोले मतदार संघासाठी भरपूर निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे अनेक विकास कामें करू शकलो भरभरून मदत करणाऱ्या महायुती सरकारला व उपभोग्य अजित पवार यांना साथ देण्यासाठी खासदार लोखंडे यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अकोले तालुक्यात जास्तीत जास्त मतदान मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आमदार किरण लहामटे यांनी म्हटले आहे

माजी आमदार वैभवराव पिचड म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य कौतुकास्पद आहे प्रत्येक घराला घर तिथे जल आणि प्रत्येक गरिबाला घर या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून झाला आहे राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना सन्मान योजनेअंतर्गत दोन हजार रुपये बँकेत वर्ग होतात अशा अनेक योजना या महायुतीच्या सरकारच्या काळात सुरू झालेल्या आहेत त्यामुळे तालुक्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही पाहून व पुन्हा पंतप्रधान मोदी यांना करण्यासाठी खासदार लोखंडे यांच्या चिन्हावर शिका मारून त्यांना प्रचंड मताने विजयी कराव असे आवाहन केले

यावेळी व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकोले तालुका अध्यक्ष शरद चौधरी भारतीय जनता पार्टीचे अकोले तालुका अध्यक्ष यशवंत आभाळे शिवसेनेचे अकोले तालुका अध्यक्ष संजय वाकचौरे, नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे शिवाजी राजे धुमाळ शिवसेना युवक अध्यक्ष महेश देशमुख आदीजण उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख एकनाथ यादव यांनी केले

संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *