निखिल सोनवणे यांचा देवठाण सोसायटीमध्ये ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
देवठाण प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील देवठाण येथील शेतकरी कुटुंबातील निखिल संजय सोनवणे याची आय डी बी आय बँकेत वरील पदावर निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने देवठाण सहकारी सोसायटीच्या सभागृहात शाल श्रीफळ व गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला
देवठाण गावचे माजी सरपंच व इंदिरा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ भिकाजी सहाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती चंद्रमोहन निरगुडे सोसायटीचे चेअरमन जालिंदर बोडके सोसायटीचे उपाध्यक्ष मुरलीधर पथवे शिवसेनेचे गटप्रमुख राम सहाने माळशेज पतसंस्थेचे संचालक श्रीकांत सहाने देवठाण सोसायटीचे सचिव शांताराम जोरवेकर पंढरीनाथ शेळके आनंदा काळे परसराम शेळके भाऊसाहेब सोनवणे भारत सहाणे प्रथमेश सहाणे ज्ञानेश्वर बोडके आदी मान्यवर उपस्थित होते

