देवठाण येथील यात्रा कमिटीच्या बैठकीत यात्रा भव्य दिव्य करण्याचे ठरले

देवठाण प्रतिनिधी

oplus_0

अकोले तालुक्यातील देवठाण येथील काश्याई माता देवस्थानची यात्रा सालाबादप्रमाणे यंदाही करण्याचे ग्रामस्थांच्या बैठकीत ठरले

देवठाण गावचे सरपंच निवृत्ती जोरवर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांची व यात्रा कमिटीची संयुक्त बैठक पार पडली या बैठकीला बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते गावातील प्रत्येक कुटुंबा कडून पाचशे रुपये वर्गणी घेण्याचे ठरविण्यात आले या वर्गणी मधून लोकनाट्य तमाशा जंगी कुस्त्यांचा हंगामा दर चांगला आर्केस्ट्रा त्याचबरोबर बैलगाड्या शर्यती करण्याचे नियोजन आहे

यात्रेच्या नियोजनासाठी सरपंच निवृत्ती जोरवर व त्यांची 17 सदस्य पंच कमिटी तसेच देवठाण विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन जालिंदर बोडके व त्यांची 13 सदस्य पंच कमिटी अशा या 30 लोकांची निवड यात्रा कमिटीचे सदस्य म्हणून करण्यात आली आहे

या यात्रा कमिटीच्या नियोजनाच्या बैठकीला अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक एडवोकेट अशोकबाबा शेळके अकोले पंचायत समिती माजी सदस्य अरुण शेळके अमृत सागर सहकारी दूध संघाचे माजी संचालक शिवाजी पाटोळे अगस्ती कारखान्याचे विद्यमान संचालक सुधीर शेळके बुवासाहेब नवले पतसंस्थेचे संचालक एकनाथ सहाने जनलक्ष्मी सहकारी पतसंस्थेचे संचालक केशव बोडके देवठाण गावचे सरपंच निवृत्ती जोरवर उपसरपंच माधव कातोरे देवठाण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन जालिंदर बोडके व्हाईस चेअरमन मुरलीधर पथवे शिवसेनेचे गटप्रमुख राम सहाणे, देवठाण गावचे पोलीस पाटील राधाकृष्ण जोरवर, देवठाण येथील सामाजिक कार्यकर्ते किरण शेळके माजी सरपंच रमेश बोडके महेश शेळके श्रीकांत सहाने दतू पाटील जोरावर, प्रथमेश सहाणे कैलास दराडे गोरख बोडके रामहरी सहाने विष्णू शेळके आदी ग्रामस्थ उपस्थित होते

oplus_0
संपादक शिवाजी पाटोळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *